शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्यांविरोधात महावितरण आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:38 IST

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३५ जणांना कारणे दाखवा नोटीस८१ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविला

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या असून अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या, या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता प्रादेशिक संचालकांनी मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविण्याच्या स्पष्ट सूचना केल्या होत्या. तसेच त्यासंदर्भातील अहवाल तीन दिवसात प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याबाबतही सांगितले होते. याअनुषंगाने महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वर्धा मंडळातील सर्वाधिक १४ तर त्याखालोखाल नागपूर ग्रामीण, बुलढाणा आणि यवतमाळ मंडळातील प्रत्येकी १०, अकोला मंडळातील ९, अमरावती मंडळातील ८, वाशिम मंडलातील ७, गडचिरोलीतील ५ तर नागपूर शहर मंडळातील ४, भंडारातील ३ तर चंद्रपूर मंडळातील १ अशा एकूण ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता जून महिन्याच्या मासिक वेतनापासून गोठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ जणांना कारणे दाखवा नोटिस बजाविण्यात आली आहे. यात नागपूर ग्रामीण मंडळातील १८, वर्धा मंडळातील १२, नागपूर शहर मंडळातील ४ तर यवतमाळ मंडळातील एका कर्मचाऱ्याचा सहभाग आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर