शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मविआचा ३३ जागांवर पेच, विदर्भातील चित्र; २९ जागांवर एकाच पक्षाने दावा केल्यामुळे मार्ग मोकळा

By कमलेश वानखेडे | Updated: September 17, 2024 08:17 IST

उर्वरित ३३ जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच कायम आहे. 

कमलेश वानखेडे

नागपूर : महाविकास आघाडीच्या विदर्भातील जागा वाटपात सुमारे ५० टक्के जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे. विदर्भातील ६२ पैकी २९ जागांवर  कोणत्याही एकाच पक्षाने दावा केला असल्यामुळे या जागांचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित ३३ जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच कायम आहे. 

विदर्भातील जागा वाटपात काँग्रेस नमते घेण्यास तयार नाही. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये आजवर झालेल्या बैठकीत २९ जागा  निकाली निघाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसच्या २४ जागा आहेत. शरद पवार गटाच्या चार, तर उद्धवसेनेच्या वाट्याची एकमेव जागा ‘क्लीअर’ झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण - पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर या  मतदारसंघांमध्ये एकाच पक्षाने दावा केला. प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या संबंधाने दुजोरा दिला आहे. 

या जागांचा मार्ग मोकळा

नागपूर : काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर

भंडारा : साकोली

गोंदिया : आमगाव

चंद्रपूर :  चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, राजुरा व वरोरा

वर्धा : देवळी

अमरावती :  तिवसा, अमरावती, मोर्शी व बडनेरा

यवतमाळ : आर्णी, राळेगाव, उमरखेड, पुसद

अकोला :  बाळापूर, अकोला व अकोला पूर्व

बुलढाणा : मलकापूर, खामगाव व शिंदखेडा राजा 

वाशिम : रिसोड

महायुतीत ७० टक्के जागांवर झाले एकमत

नागपूर : महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागा वाटपासाठी ८० किंवा ९० अशा कुठल्याही आकड्याचा आग्रह धरलेला नाही. जेथे अजित पवार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह, जिथे शिंदे सेनेचे आमदार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह व  जेथे भाजपचे उमेदवार जिंकतील तेथे आमचा आग्रह मान्य करू. आम्ही  जिंकण्यासाठी लढण्याचा ‘फॉर्म्युला’ निश्चित केला असून, आजवर ७० टक्के जागांवर एकमत झाले आहे, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे  सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,  उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे सत्ता दिली. ते कधी मंत्रालयात गेले नाहीत. विधानभवनातही गेले नाहीत. ते आता जुनी पेन्शन देऊ, असे खोटे बोलत आहेत. आमचे सरकार सगळे

प्रश्न सोडवत आहे. सोयाबीन, बासमतीच्या शेतकऱ्यांना फायदा झाला. पीक हातात आल्यावर शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला लवकरच दिसेल.

‘काँग्रेसचा खरा चेहरा आला समोर’ 

संजय गायकवाड यांचे समर्थन करत नाही.  आरक्षण रद्द करू, असे राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढ्यांच्या पोटात जे होते ते आज ओठावर आले.

काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसच आहे. जरांगे - पाटील यांनीसुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024BJPभाजपाShiv Senaशिवसेना