शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची फसवणूक : पतसंस्थेविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 21:02 IST

वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम महावितरणकडे संपूर्णपणे जमा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे१९ लाख ७१ हजार ६४८ रुपयांचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम महावितरणकडे संपूर्णपणे जमा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेकडील वीज बिल भरणा केंद्र्राचा परवाना रद्दबातल करण्यात आला असून ग्राहकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेकडे फेब्रुवारी २०१४ पासून महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र होते, मात्र जुलै २०१७ पासून या पतसंस्थेने ग्राहकांनी वीज बिल भरणा केलेल्या रकमेचा पूर्णपणे महावितरणकडे भरणा न करता महावितरणसोबत केलेल्या कराराचा भंग केला. जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल १९ लाख ७१ हजार ६४८ रुपये कमी जमा करीत या रकमेचा अपहार केला. सोबतच संस्थेने जुलै २०१७ पासून महावितरणला ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेचा हिशेब देणेही बंद केले होते. नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेने वास्तविकतेपेक्षा कमी रकमेचा भरणा केला असल्याचे लक्षात येताच याबाबत पाठपुरावा करण्यात आला असता संस्थेने त्यास प्रतिसाद न दिल्याने महावितरणने खापा पोलीस ठाण्यात सदर संस्थेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोबतच या संस्थेकडे वीज बिल स्वीकारण्याची असलेली परवानगीही रद्द केली आहे.महावितरणच्या तक्रारीच्या अनुषंगाने खापा पोलिसांनी नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्हा दाखल होऊन सात दिवस होऊनही स्थानिक पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई न केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, या संस्थेला वीज बिल स्वीकारण्यास परवानगी नाकारल्याने वीज ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलांचा भरणा करू नये, असे आवाहनही महावितरणकडुन करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCrimeगुन्हा