शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी जयंती विशेष:प्रेरणेचे प्रतीक नागपुरातील 'गांधी विहीर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:10 IST

सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले.

ठळक मुद्दे१९३३ मध्ये महात्मा गांधी यांच्या पुढाकारतून खोदली विहीर : बोरकरनगरातील सफाई कामगारांचे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले. विशेष म्हणजे, १२ दिवसाच्या श्रमदानातून ही विहीर उभी राहिली. कमला नेहरू यांनी ही विहीर खोदण्यासाठी आपली सोन्याची बांगडी काढून दिली होती, असे सांगण्यात येते. 'गांधी विहीर' म्हणून आजही या विहिरीची वेगळी ओळख आहे. 

कॉग्रेसच्या अधिवेशनासाठी महात्मा गांधीनागपूरला आले होते. सफाई कामगारांना सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी सफाई कामगारांची वसाहत असलेल्या बोरकरनगरातच विहीर खोदण्यासाठी पुढाकार घेतला. त्या काळातील आठवणींना उजाळा देत बोरकरनगरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले, त्याकाळी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव होता. सफाई कामगारांसाठी स्वतंत्र विहीर खोदण्यासाठी महात्मा गांधी यांनी निर्णय घेतल्याने लोकांमध्ये उत्साह होता. बोरकरनगरातच विहिरी खोदायची असल्याने ती वसाहतीच्या मधोमध असावी असा लोकांचा आग्रह होता. कामगारांनी दिवस-रात्र एक करून केवळ १२ दिवसात विहीर खोदून काढली. विहिरीचे लोकार्पण स्वत: महात्मा गांधी यांनी केले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुनमचन्द राका व ज्येष्ठ नागरिक जंगलूजी बढेल यांनी या विहिरीच्या देखभालीची जबाबदारी हाती घेतली. ही विहीर बोरकरनगरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या नागरिकांसाठी जीवनदायी ठरली. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध सिनेकलावंत व काँग्रेसचे नेते दिवंगत सुनील दत्त यांनीही या विहिरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी परिसरातील लहान मुलांना विहिरीच्या पाण्याद्वारे अंघोळ घालून दिली होती, असेही नागरिक सांगतात.'गांधी विहीर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या विशेष विहिरीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा, अशी मागणी महात्मा गांधी विचार मंचने केली आहे. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विहिरीच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन केले. परंतु देखभालीअभावी काही वर्षातच सर्वच नष्ट झाले. दरम्यान मनपातर्फे या विहिरीलगत गडर लाईन टाकण्याचे काम झाले. येथील नागरिकांनी याला विरोधही केला, परंतु अधिकाऱ्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. आज या विहिरीला गडरची घाण लागली आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बापूंच्या विहिरीची दुर्दशा झाली आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर