शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'केंद्र सरकारच्या जिवावर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 12:54 IST

शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत.

नागपूरः शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, अशी मागणीच त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले, आमचं काळजीवाहू सरकार होतं, त्यावेळी आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. त्यानंतर आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यासंदर्भातले जीआर काढू शकलो नाहीत.जयंत पाटील म्हणाले आम्ही सहा हजार कोटी रुपये दिले आहेत. 93 लाख हेक्टर जमीन म्हणजे 23 हजार कोटी रुपये किमान हे त्यांनी द्यायला पाहिजे होते. साडेपाच ते सहा हजार कोटी केवळ त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत. त्यामुळे 25 हजार रुपये हेक्टरानं 23 हजार कोटी रुपये कधी देणार हे आम्ही त्यांना विचारलं आहे. केंद्राकडे सर्व गोष्टी टोलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा सुरू आहे. केंद्र सरकारचे नियम ठरलेले असतात, आमचेही पाच वर्ष सरकार होतं, केंद्रानं तसे आम्हाला पैसे दिले आहेत. आघाडी सरकारपेक्षा जास्त पैसा हा मोदी सरकारनं राज्याला दिला आहे.पण त्याचे नियम आणि निकष ठरलेले होते. तुम्ही घोषणा करताना स्वतःच्या जिवावर केली होती की केंद्र सरकारच्या जिवावर केली होती, याचंदेखील उत्तर मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांनी दिलं पाहिजे. आपलं अपयश लपवण्याकरिता केंद्र सरकारचं नाव घेणं हे योग्य नाही . आम्ही आमच्या भरवशावर शेतकऱ्यांना मदत दिली होती. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आम्ही राज्याच्या भरवशावर मदत केली आहे. तुमची मागणी होती, तुम्ही किमान समान कार्यक्रम तयार केला. किमान समान कार्यक्रमात अवकाळी शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीचे मुद्दे ठरवण्यात आले होते. पण शेतकऱ्यांना अद्यापही तुम्ही मदत देऊ शकलेला नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन