शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session 2022 : एकही राज्यमंत्री नाही, तरी बंगल्यांवर उधळपट्टी का?, सुनील प्रभू यांचा विधानसभेत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 07:06 IST

सोमवारी विधानसभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना राज्यमंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी का केली गेली, असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे गट) मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सोमवारी विधानसभेत सरकारला विचारला. ‘लोकमत’ने हा मुद्दा लावून धरला होता, हे विशेष. सोमवारी विधानसभेत हरकतीच्या मुद्द्याद्वारे प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले, सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना त्यांच्यासाठी असलेले बंगले सजवले आहेत. एकीकडे सरकार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढते आहे, तर दुसरीकडे अशाप्रकारे जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे सरकारने यावर त्वरित खुलासा करावा. तसेच सुयोग इमारतीत आतापर्यंत पत्रकारांचीच राहण्याची व्यवस्था केली जात होती. यंदा या इमारतीला दोन भागात विभागण्यात आले. यात एका भागात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या स्टाफला जागा देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.हेही वाचा - Winter Session 2022 : मंत्रिमंडळात २० मंत्री, मात्र तयार होताहेत ४२ बंगले

मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही... या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार, याची सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठे माहिती असते. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार कधीही करू शकतो. या अधिवेशनातही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तशी तयारी केली असावी, असे स्पष्ट केले.

फडणवीसांची प्रभूंना ऑफरयादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत सुनील प्रभू यांना मंत्रिपदाची ऑफरसुद्धा देऊन टाकली. फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो, असे म्हणताच प्रभू यांनी कधी करता? असा प्रश्न केला. तेव्हा फडणवीस यांनी चिमटा काढला. तुम्हाला संधी हवी आहे का? असे म्हणत मंत्रिपदाची ऑफर दिली. तसेच हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचेही स्पष्ट केले.

टॅग्स :Sunil Prabhuसुनील प्रभूMaharashtraमहाराष्ट्रWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन