शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना! ग्राहकांना ५८ लाखांचा फायदा; 'मुद्रांक शुल्क व दंडात सवलत'

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 20, 2024 19:48 IST

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ जाहीर केली आहे.

नागपूर: महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ जाहीर केली आहे. ही योजना ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत आणि माफी देणारी आहे. योजनेत १७ जानेवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यांतर्गत १९१ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याअंतर्गत ग्राहकांना ५८ लाख रुपयांचा फायदा मिळाला.

एकूण १९१ प्रकरणे निकाली नागपूर शहरात २४७ प्रकरणांची नोंद झाली, तर १५२ प्रकरणांमध्ये वसुली करण्यात आली आहे. ९५ प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये १७.८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यानुसार एकूण २४.८८ लाख रुपयांची वसुली झाली. तसेच नागपूर ग्रामीणमध्ये ४० प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी अर्ज दाखल झाले. त्यात ३९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात २३.५४ लाखांचे मुद्रांक, ६.८४ लाखांचा दंड आणि नोंदणी फी शुल्कातून २.६२ लाख रुपये अर्थात एकूण ३३ लाख रुपयांची वसुली झाल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे आणि नागपूर शहरचे मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी दिली.

योजना दोन टप्प्यात ३१ मार्चपर्यंतराज्य सरकारने ही योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी दोन टप्प्यात आणली आहे. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत कालावधीत अर्ज सादर केल्यास १ रुपये ते १ लाख इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये १०० टक्के माफी आणि एक लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कावर ५० टक्के माफ आणि १०० टक्के दंड माफ केला जाणार आहे. तसेच दुसऱ्या टप्पा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी असून अर्ज केलेल्यांना १ रुपये ते १ लाख इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कात ८० टक्के आणि दंडामध्ये ८० टक्के माफी तसेच १ लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कात ४० टक्के आणि दंडात ७० टक्के माफी मिळेल. 

योजना सर्व प्रकारच्या दस्तऐवजांना लागूअभय योजना ही सर्व प्रकारच्या नोंदणीस दाखल केलेल्या अथवा न केलेल्या सर्व प्रकारच्या दस्तऐवजांना लागू आहे. सवलत वा माफी मिळण्यासाठी पक्षकार, त्यांचे वारस अथवा मुखत्यारपत्र धारकांस मूळ दस्तऐवजांसह मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा सह दुय्यम निबंधक यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. दस्तऐवज कायदेशिररीत्या योग्य आणि मुद्रांकित करून घेण्यासाठी योजना फायद्याची असल्याचे संजय तरासे आणि तानाजी गंगावणे यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर