शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच - भागवत कराड

By योगेश पांडे | Updated: October 11, 2023 16:53 IST

केंद्राच्या योजनांबाबत खासगी बॅंकांकडून हवा तसा प्रतिसाद नाहीच

नागपूर : केंद्र शासनाने लहान व्यावसायिक, पथविक्रेते यांच्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच आहे. देशात राज्याचा सातवा क्रमांक असून याबाबत वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. नागपुरात बुधवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

शेतकरी, उद्योजक, पथविक्रेते यांच्यासह इतरही घटकांना अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक योजना केंद्र सरकारकडून बँकांच्या माध्यमातून राबवल्या जातात. यात राष्ट्रीयकृत बँकांकडून योगदान करण्यात येत आहेच. मात्र खासगी बॅंकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळलेला नाही. यासंदर्भात लवकरच या बॅकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक ते निर्देश जारी करण्यात येतील, असे कराड यांनी स्पष्ट केले.

१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे बॅंक खाते

सद्यस्थितीत देशात ५० कोटींहून अधिक नागरिकांचे जनधन योजनेअंतर्गत बॅंक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यांमध्ये २ लाख ४ हजार ४८२ कोटी रुपये आहेत. जनतेचा या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बॅंक खाते असावे अशी केंद्राची भूमिका आहे. त्यामुळेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाचे बॅंक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर मतदार यादीच्या आधारे बॅंक खाती सुरू करण्याच्या सूचनादेखील बॅंकांना देण्यात आल्या आहेत, असे कराड यांनी सांगितले.

देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत

जगातील अनेक देश आर्थिक संकटांचा सामना करत असले तरी भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. गोरगरीब नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान मुद्रा लोनअंतर्गत ४३ लाख कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकादेखील फायद्यात असून या वर्षातील नफ्याचा आकडा १.०४ लाख कोटी इतका आहे.. बॅंकाचा एनपीए ११ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतnagpurनागपूर