महाराष्ट्र एक्स्प्रेस, इतवारी-रिवात दोन अतिरिक्त स्लिपर कोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:06 IST2021-06-25T04:06:59+5:302021-06-25T04:06:59+5:30

नागपूर : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि त्यांना कन्फर्म बर्थ उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून जाणाऱ्या महाराष्ट्र ...

Maharashtra Express, Itwari-Rivat Two additional sleeper coaches | महाराष्ट्र एक्स्प्रेस, इतवारी-रिवात दोन अतिरिक्त स्लिपर कोच

महाराष्ट्र एक्स्प्रेस, इतवारी-रिवात दोन अतिरिक्त स्लिपर कोच

नागपूर : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि त्यांना कन्फर्म बर्थ उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि इतवारी-रिवा-इतवारी एक्स्प्रेसमध्ये दोन अतिरिक्त स्लिपर कोच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूरमध्ये २२ जूनपासून ३० जून २०२१ पर्यंत तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०१०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये २४ जून ते २ जुलैपर्यंत दोन अतिरिक्त कोच उपलब्ध राहणार आहेत. तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०१७५४ रिवा-इतवारी एक्स्प्रेसमध्ये २६ जून आणि रेल्वेगाडी क्रमांक ०१७५३ इतवारी-रिवा एक्स्प्रेसमध्ये २७ जून रोजी दोन अतिरिक्त स्लिपर क्लास कोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे सामान्य कोचमध्ये प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना या अतिरिक्त कोचचा लाभ होणार आहे.

..............

Web Title: Maharashtra Express, Itwari-Rivat Two additional sleeper coaches