शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Maharashtra Budget 2019 : समृद्धी, मेट्रो व स्मार्ट सिटीला बूस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:45 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी आणि माझी मेट्रोच्या कामासाठी कोट्यवधीची भरीव तरतूद करण्यात आली असून नागपूरच्या विकासाला आणखी बूस्ट मिळाले आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक वीज दर सवलतीला मंत्रिमंडळाने पाच वर्षे मुदतवाढ देऊन औद्योगिक विकासालाही चालना दिली आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात मिळाले भरभरून : समृद्धीच्या भूसंपादनासाठी ७ हजार कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या अर्थसंकल्पात समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी आणि माझी मेट्रोच्या कामासाठी कोट्यवधीची भरीव तरतूद करण्यात आली असून नागपूरच्या विकासाला आणखी बूस्ट मिळाले आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक वीज दर सवलतीला मंत्रिमंडळाने पाच वर्षे मुदतवाढ देऊन औद्योगिक विकासालाही चालना दिली आहे.अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. नागपुरात सध्या मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटी आणि मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. ही कामे नियोजित वेळेत पूर्णत्वास जावी, या उद्देशाने या तिन्ही प्रकल्पांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरसह पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नाशिक, ठाणे, औरंगाबाद आणि पिंपरी चिंचवड या आठ शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तब्बल २ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवडल्या गेलेल्या या ८ शहरात आतापर्यंत १ हजार ३८८ कोटी रुपयांचे ५१ प्रकल्प पूर्ण झाले. ४ हजार ८७२ कोटी रुपयांचे ९८ प्रकल्प प्रगतिपथावर आहेत, हे विशेष.नागपूर मेट्रो रेल्वेचे काम झपाट्याने सुरू आहे. नागपूरमध्ये मेट्रोच्या उद्घाटनाचीही तयारी झाली आहे. आचारसंहितेपूर्वी मेट्रो रेल्वे धावण्याची शक्यता आहे. याकरिताही निधी उपलब्ध करून दिला आहे.मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाच्या भूसंपादनासाठी तब्बल सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत ७०० किलोमीटर क्षेत्राचे भूसंपादन या मार्गासाठी झाले आहे, हे विशेष. या मार्गावरून मुंबई थेट सात ते आठ तासांत गाठता येणार आहे. त्याहीपेक्षा या मार्गावरच्या विदर्भातील गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग भविष्यात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.यासोबतच औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागांतर्गत १४ जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील शेतकऱ्यांना तांदूळ व गहू यांचा सवलतीच्या दराने पुरवठा व्हावा यासाठी ८९६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, हे विशेष.सिंचनासाठीही भरघोस मदतअर्थसंकल्पात सिंचनासाठी ८ हजार ७३३ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. यात विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना अर्थसाहाय्य होणार आहे. याशिवाय जलयुक्त शिवार योजना, सूक्ष्म सिंचन, विहिरी, शेततळे, रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान घरकुल योजना आदींसाठीही कोट्यवधीची तरतूद करण्यात आली असून त्याचा फायदाही नागपूरसह विदर्भाला मिळणार आहे.

‘माझी मेट्रो‘ला मिळाले ३०० कोटी          

अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३०० कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २३० कोटी रुपये मंजूर केले आहे. दोन्ही प्रकल्पाचे संचालक महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीतर्फे (महामेट्रो) करण्यात येते. राज्य सरकारने सुधारित आराखड्यात नागपूर मेट्रोकरिता १६० कोटी आणि पुणे मेट्रोसाठी ३४२.७७ कोटी रुपयांची वाढ केली आहे. याप्रकारे दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी महामेट्रोला एकूण ५३० कोटी रुपये मिळणार आहे. वित्तीय वर्षाअखेर सुधारित आराखड्यात ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी वित्तीय वर्ष २०१८-१९ मध्ये रक्कम वाढवून देण्यात आली आहे. ही रक्कम ४६० कोटी रुपये होती. बजेटमध्ये नागपूर मेट्रोला ३१० कोटी आणि पुणे मेट्रोचा सुधारित आराखडा ४७२.७७ कोटी रुपयांचा होता. पण बजेटमध्ये १३० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 

टॅग्स :Maharashtra Budget 2019महाराष्ट्र बजेट 2019nagpurनागपूर