शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

भाजपच्या ‘होम पीच’वर यावेळीही फडणवीसांना ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी

By योगेश पांडे | Updated: October 29, 2024 10:32 IST

Maharashtra Assembly Election 2024 : मताधिक्याच्या उतरत्या ग्राफमुळे आव्हान : काँग्रेसचे गुडधे देणार दमदार टक्कर

- योगेश पांडे

नागपूर : उपराजधानीतील स्मार्ट मतदारसंघ व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदा राजकीय कारकिर्दीतील ‘डबल हॅट्ट्रिक’ची संधी आहे. मात्र, मागील काही निवडणुकांच्या तुलनेत यंदा फडणवीस यांच्यासमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: या मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपचा मताधिक्याचा ग्राफ उतरता राहिला आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्याशी फडणवीसांना पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे.

या मतदारसंघात खुला प्रवर्ग, ओबीसी, सिंधी व अनुसूचित जातीच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही येथे चांगले नेटवर्क आहे. २००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ तयार झाला, तेव्हापासून येथे भाजपचे प्राबल्य आहे. २०१९ च्या  निवडणुकीत फडणवीस यांनी येथून विजयाची हॅट्ट्रिक केली होती. राज्याच्या राजकारणात व्यग्र असले तरी फडणवीस हे नियमितपणे  मतदारसंघाचा आढावा घेतात व अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या घरीदेखील भेट देतात. 

काही पट्ट्यात तिरंगी लढतीची दाट शक्यता हरयाणा विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी असलेल्या काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांच्याविरोधात फडणवीस यांची ही दुसरी लढत ठरेल. २०१४ मध्ये फडणवीसांनी गुडधेंवर ५८,९४२ मतांनी विजय मिळवला होता. याशिवाय यंदा वंचित बहुजन आघाडीकडून विनय भांगे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांचेही आव्हान महत्त्वाचे ठरू शकेल. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देसंथ गतीने सुरू असलेली विकासकामे, कचरा, पार्किंग, अतिक्रमण समस्या, ऑरेंज स्ट्रीटवरील ग्रीन कव्हर हटविणेनागपूर शहरातील २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचा फुटलेला फुगा

लोकसभेत मताधिक्य घटलेभाजपचा बालेकिल्ला असूनही लोकसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपुरात भाजपला धक्का बसला. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना ३३,५३५ मतांची आघाडी मिळाली.२०१९ साली गडकरी यांचे दक्षिण-पश्चिम नागपुरात ५५,११६ इतके मताधिक्य होते. यावेळी मताधिक्य २१,५८१ ने घटले. २०१४ मध्ये त्यांचे मताधिक्य ६२,७२३ इतके होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम