शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:10 IST

शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने पश्चिम नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

ठळक मुद्देबाईक रॅलीद्वारे सांगता : नागरिकांना केले आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने पश्चिम नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गेले १० दिवस पश्चिम नागपूरच्या गल्लोगल्लीत त्यांनी पदयात्रा, जनसंवाद सभा, बैठका घेऊन मतदारांशी संपर्क साधला. पण अखरेच्या दिवशी बाईक रॅली काढून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत मतदारांना भाजपाला साथ देण्याचे आवाहन केले.फुटाळा परिसरातून देशमुख यांची बाईक रॅली निघाली. खुल्या जीपवर सुधाकर देशमुख भगवा फेटा घालून होते, सोबत पश्चिम नागपुरातील पदाधिकारी होते. ही रॅली वायुसेनानगर, हजारी पहाड, गंगानगर, फ्रेंड्स कॉलनी, गिट्टीखदान, बोरगाव, अवस्थीनगर, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, छावणी, सदर, गड्डीगोदाम, बजेरिया, सीताबर्डी, रामदासपेठ, काचीपुरा, धरमपेठ, रामनगर, शंकरनगर परिसरातून गेली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते पक्षाचे चिन्ह, झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान काही मुख्य चौकांमध्ये देशमुख यांचे स्वागतही करण्यात आले. दरम्यान सर्वांना हात जोडून ते आवाहन करीत होते. रॅलीत नगरसेवक संदीप जाधव, संजय बंगाले, मायाताई इवनाते, सुनील हिरणवार, सुनील अग्रवाल, प्रमोद कौरती, प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, रूपा रॉय, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, भूषण शिंगणे, अर्चना पाठक, कृतिका मसराम, संगीता गिºहे आदी सहभागी झाले होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष किशन गावंडे, अभय दीक्षित, घनश्याम चौधरी, विनोद कन्हेरे, पप्पी वाजपेयी, रमेश चोपडे, नरेश बरडे, जयप्रकाश गुप्ता, रमेश गिरडे, सुनील अग्रवाल, अशोक डोर्लीकर, सुनील मिश्रा, कंचना करमरकर, सतीश डांगोर, रमेश गौर, डॉ. उमर खानसुद्धा संपूर्ण रॅलीत सहभागी होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhakarrao Deshmukhसुधाकरराव देशमुखnagpur-west-acनागपूर पश्चिम