शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात विजयी दिवाळी कुणाची, होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:01 IST

दिवाळीला चार दिवसाचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे गुरुवारी २४ ऑक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या मतदानांची मोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार असून, पहिल्या एका तासात निकालाचा प्रथम कौल जाहीर होणार आहे.

ठळक मुद्देसकाळी ८ पासून मतमोजणी, प्रशासन सज्ज : पहिला कौल सकाळी ९ वाजता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीला चार दिवसाचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे गुरुवारी २४ ऑक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या मतदानांची मोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार असून, पहिल्या एका तासात निकालाचा प्रथम कौल जाहीर होणार आहे. परंतु संपूर्ण निकाल जाहीर होण्यासाठी मात्र उशीर लागण्याची शक्यता आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नागपूर जिल्ह्यातील १२ ही विधानसभेसाठी एकूण १४६ उमेदवारांचा फैसला सध्या ईव्हीएममध्ये बंदिस्त आहे. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे आठ विद्यमान आमदार, काँग्रेसचे माजी मंत्री आणि शहराध्यक्षांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात बहुतांश थेट लढत आहे, तर काही ठिकाणी चुरस आहे. त्यामुळे कोण जिंकणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. मतदारांनी नेमका काय फैसला केला आहे, विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, याचे चित्र गुरुवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. दिवाळीच्या तोंडावरच विजयाची माळ गळ्यात पडणार असल्याने त्याचा आनंदही फटाके फोडून साजरा करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.दरम्यान मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक मतदार संघात १४ ते २० टेबल लागणार असून, १७ ते ३१ फेऱ्या होणार आहेत. एकूण २०२ टेबल असून, २७४ फेऱ्या होतील.पूर्व व पश्चिमचा निकाल सर्वात अगोदरमतमोजणीच्या एकूण फेºया विचारात घेता, नागपूर पूर्व व नागपूर पश्चिमच्या मतमोजणीच्या एकूण फेºया १७ असून, इतर विधानसभा मतदार संघातील फेऱ्यांच्या तुलनेत त्या सर्वात कमी आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातील निकाल सर्वात अगोदर लागतील. तसेच सावनेर, हिंगणा, उमरेड व दक्षिण-पश्चिममध्ये २७ ते ३१ फेºया होणार आहेत, त्यामुळे या मतदार संघाच्या निकालास उशीर होण्याची शक्यता आहे.कुणाचे भाग्य फळफळणारनागपूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये नागपूर दक्षिण-पश्चिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. आशिष देशमुख, नागपूर दक्षिण : मोहन मते, गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, सतीश होले, नागपूर पश्चिम : सुधाकर देशमुख, विकास ठाकरे, नागपूर उत्तर : डॉ. मिलिंद माने, डॉ. नितीन राऊत, सुरेश साखरे, नागपूर मध्य : विकास कुंभारे, बंटी शेळके, नागपूर पूर्व : कृष्णा खोपडे, पुरुषोत्तम हजारे, काटोल : अनिल देशमुख, चरणसिंग ठाकूर, सावनेर - सुनील केदार, डॉ. राजीव पोतदार, हिंगणा - समीर मेघे, विजयबाबू घोडमारे, उमरेड- सुधीर पारवे, राजू पारवे, कामठी - टेकचंद सावरकर, सुरेश भोयर, रामटेक - डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उदयसिंग यादव, आशिष जयस्वाल.प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांनी केली व्यवस्थेची पाहणी 
मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसंदर्भात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी बुधवारी मतमोजणी केंद्रांना भेट देवून व्यवस्थेची पाहणी केली. तसेच मतमोजणीसंदर्भात कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यात.विधानसभेसाठी जिल्ह्यातील ४ हजार ११२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून मतदानानंतर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष मतमोजणी उद्या गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी २०२ टेबल राहणार असून मतमोजणीच्या २७४ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. पत्रकारांसाठी निवडणूक आयोगाने प्राधिकार पत्रे दिले आहेत. त्या प्राधिकारपत्राद्वारे त्यांना मतमोजणीच्या ठिकाणी असणाऱ्या माध्यम केंद्रात जाता येईल.मोबाईलवर राहणार बंदीमतमोजणीच्या ठिकाणी मोबाईलला बंदी राहील. केवळ निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणी निरीक्षक सोडले तर कुणालाही मोबाईल आत नेता येणार नाही. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा मोबाईल केवळ प्रसिद्धी माध्यम कक्षापर्यंतच वापरण्याची परवानही राहील.मतदार संघ : १२मतमोजणी केंद्र : १२एकूण उमेदवार : १४६झालेले मतदान : ५७.२० टक्केमतमोजणी कर्मचारी : ५ हजार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Result Dayपरिणाम दिवस