शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:33 IST

राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे.

ठळक मुद्दे५६ उमेदवारांच्या प्रचारासाठी ११७६ लोक सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रचारासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, सोशल मीडियावर उमेदवार प्रचार करीत असतात. यात कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊ नये म्हणून सायबर सेलची बारीक नजर आहे. यासाठी सायबर सेलची स्वतंत्र टीम काम करीत आहे. नागपुरातील ५६ उमेदवार सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते स्वत:च प्रचार करीत आहेत. या उमेदवारांसोबतच ११७६ लोक सुद्धा त्यांचा प्रचार करीत आहे. या सर्वांच्या प्रत्येक पोस्टवर बारीक नजर ठेवली जात आहे. कुणाच्याही व्यक्तिगत किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याकडे सायबर सेल नजर ठेवून आहे. कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली की, लगेच त्याची दखल घेतली जाते. संबंधितांना बोलावून स्पष्टीकरण मागविले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टवर नजर ठेवणे मात्र कठीण जात आहे. यावरील पोस्टबाबत एखाद्याने तक्रार केली तरच कारवाई शक्य असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.तीन गुन्हे दाखलसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याबाबत आतापर्यंत तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे तिन्ही गुन्हे तक्रार केल्यानंतरच दाखल झाले. एक सावनेर, दुसरे नंदनवन आणि तिसरे प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.१७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरणनिवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचाराची प्रत्येक जाहिरात ही प्रमाणित करूनच प्रकाशित व्हावी, यासाठी एमसीएमसी कमिटी गठित केली आहे. या कमिटीने प्रमाणित केल्यावरच उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य प्रकाशित केले जाते. आतापर्यंत १७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडियाcollectorजिल्हाधिकारी