शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचाराचा रोज तयार होतो अहवाल : एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 19:56 IST

सोशल मीडियाचा वापर दुधारी शस्त्रासारखा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचाराचा रोजचा अहवाल तयार केला जात आहे. यासाठी सायबर सेलची यंत्रणा कामी लागली असून हा अहवाल दरररोज सायंकाळी निवडणूक आयोगाकडे जात आहे.

ठळक मुद्देउमेदवारांच्या प्रचारावर सायबर सेलची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या प्रचारासाठी आजवर वापरण्यात आलेल्या पारंपारिक साधनांमध्ये आता सोशल मीडियाचीही भर पडली आहे. या माध्यमाचा वापर दुधारी शस्त्रासारखा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचाराचा रोजचा अहवाल तयार केला जात आहे. यासाठी सायबर सेलची यंत्रणा कामी लागली असून हा अहवाल दरररोज सायंकाळी निवडणूक आयोगाकडे जात आहे.निवडणूक काळातील सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी क्रिस्टो फॉरेन्सिक एजंसीची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून सायबर सेलच्या चमुने या निवडणुकीत तीन दिवसांपूर्वी सदर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आठ गुन्हे दाखल करण्यात आले होते.सायबर सेलची ही चमू राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर नजर ठेऊन राहणार आहे. वापरलेले इमोजी, फॉरवर्ड आणि शेअर होणाऱ्या पोस्ट, त्याला मिळणारे लाईक्स, प्रक्षोभक प्रतिक्रिया याची नोंद प्रत्यक्ष उमेदवाराच्या नावानुसार घेतली जात आहे. सायबर सेलच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचीही तरतुद आहे. एवढेच नाही तर प्रचार होत असल्यास संबंधित उमेदवाराच्या अकांउंटमधून पैसे कपात केले जाणार आहेत.नोडल ऑफिसर आणि तीन कमेट्याया कामावर लक्ष ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या अंतर्गत तीन कमेट्या तयार करण्यात आल्या आहे. यात सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यासाठी तीन कमेट्या तयार करण्यात आल्या असून रोज मॉनिटरिंग सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमाच्या कक्षात पाच दूरदर्शन संच लावण्यात आले असून त्याचेही रोज मॉनिटरिंग सुरू असते. सोशल मीडियावरील नियंत्रणासाठी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) मोनिका राऊत आणि पत्रकार प्रतिनिधी म्हणून मोहित हक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.४२ अ‍ॅप्स धोकादायक घोषितनिवडणूक आयोगाने ४२ अ‍ॅप्स धोकादायक घोषित केले आहेत. यात वेबो, वुइचाट, शेअरइट, ट्रयुकॉलर, युसी न्यूज, युसी ब्रॉडकास्ट, ब्युटीप्लस, न्यूजडॉग आदींसह ४२ अ‍ॅप्सचा यात समावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी निर्बंध नसले तरी निवडणूक कर्तव्यावरील अधिकाऱ्यांना मात्र माहितीच्या आदाप्रदनासाठी या अ‍ॅप्सच्या वापरावर निवडणूक काळासाठी मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया