शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Maharashtra Assembly Election 2019 : मतदारांपर्यंत व्होटर स्लीप १६ ऑक्टोबरपूर्वी पोहोचवा : चंद्रभूषण कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 22:32 IST

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगातर्फे विभागातील निवडणुकीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले.विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर विभागातील मतदार संघनिहाय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करावयाच्या व्यवस्थेचा आढावा उपनिवडणूक आयुक्त यांनी घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरीक्षक मुरली कुमार, पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय उपस्थित होते.विभागातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदान केंद्र्रांवर करावयाच्या आवश्यक सुविधेसह दिव्यांग मतदारांसाठी करावयाच्या आवश्यक व्यवस्थेसंदर्भातील आढावा घेताना उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार म्हणाले की, मतदारांना मतदान केंद्र्र तसेच मतदार यादीतील नावांबाबत माहिती असलेली व्होटर स्लीप वाटपासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी विशेष मोहीम राबवून प्रत्येक मतदारांपर्यंत १६ ऑक्टोबरपूर्वी पोहचविण्याची व्यवस्था करावी, तसेच यासंदर्भातील दैनंदिन अहवाल आयोगाला सादर करावा, अशा सूचना यावेळी दिल्या.दिव्यांग मतदारांना मतदानासाठी रॅम्पसह इतर आवश्यक सुविधा, आवश्यकतेनुसार व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेललिपीतील व्होटर स्लीप मतदान केंद्रावर उपलब्ध करून द्याव्यात. निवडणुकीसंदर्भात मतदारसंघनिहाय करण्यात आलेल्या व्यवस्थेसंदर्भातील भंडारा, वर्धा, चंद्रपूूर व नागपूर जिल्ह्याचा आढावा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून घेण्यात आला. यामध्ये मतदान केंद्रावर करण्यात यावयाची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम पॅडची संख्या, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, सुरक्षेचा आढावा, मतदान जागृती आढावा अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती तसेच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आदी विषयांवर माहिती घेतली.निवडणूक खर्चाचा हिशेब नियमित द्यावाविशेष खर्च विषयक निरीक्षक मुरली कुमार यांनीही निवडणूक काळात विशेष मोहिमेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या तपासणी मोहीम अधिक प्रभावी करावी. तसेच या तपासणीमध्ये रोख, अवैध दारू आदी साहित्य जप्त करुन त्याबाबतचा अहवाल नियमित सादर करावा, अशा सूचना यावेळी दिल्यात.कायदा व सुव्यवस्था कायम ठेवाविधानसभेच्या निवडणुका निर्भय व निष्पक्षपणे पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच कुठेही कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही यासाठी आराखडा तयार करुन त्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी. मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही तसेच मतदारांना सहजपणे मतदान करता येईल यादृष्टीने नियोजन करावे. तसेच मतदारसंघनिहाय गठित करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकांकडून प्रत्येक तसेच संशयित वाहनाची तपासणी करणे, आंतरराज्य व आंतरजिल्हा नाक्यावर कायम तपासणी पथके तैनात करावी. या पथकाकडून दैनंदिन अहवाल मागवावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग