शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : राहुल गांधी यांनी जाणून घेतली काँग्रेसची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 22:11 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनागपूर विमानतळावर उमेदवार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विमानतळावर मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट आर्वीकडे रवाना झाले.वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे निवडणूक प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांचे दुपारी १.१५ वाजता विमानतळावर आगमन झाले. १.२० वाजता बेल्ट क्रमांक १ वर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी एकेक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रत्येक विधानसभा निहाय काँग्रेसची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी जिल्ह्यातील पक्षाची एकूण स्थितीची त्यांना माहिती दिली. काँग्रेस उमेदवारांशिवाय माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश सचिव अतुल कोटेचा व मुजीब पठाण, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, नितीन कुंभलकर, बबनराव तायवाडे, के. के. पांडे, अभिषेकवर्धन सिंह आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी जवळपास १७ मिनिट चर्चा केली. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यांच्यासोबत प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांच्या नावांची एक यादी काँग्रेसतर्फे सुरक्षा रक्षकांना सोपवण्यात आली होती. परंतु काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. शेळके यांनी फोन लावला. मल्लिकार्जुन खरगे यांना माहिती होताच ते बाहेर आले आणि शेळके यांना आत घेऊन गेले.पदाधिकाऱ्यांनी मांडल्या व्यथाराहुल गांधी यांच्यासमोर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांनी अल्पसंख्याकांना एकही जागा न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचप्रकारे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनी महिलांना प्रतिनिधित्व न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर राहुल गांधी यांनी त्यांना थोरात व खरगे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर