लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या आचारसंहितेचा पुरेपूर लाभ उठवत पोलिसांनी कायद्याचा दंडा असा काही फिरवला की शहरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दर दोन दिवसानंतर तडीपार, एमपीडीएचे आदेश काढून ३० गुंडांना पोलिसांनी शहराबाहेर हाकलून लावले तर ४१ गुंडांना कारागृहात डांबले. खतरनाक गुंडांच्या ११ टोळ्यांवर मकोका लावून त्यांची वर्षभरासाठी विविध कारागृहात रवानगी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असल्याने नागपुरातील विधानसभा निवडणुकीकडे केवळ राज्यच नव्हे तर आजूबाजूच्या प्रांतातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. सर्वधर्मसमभाव जपणारे शहर म्हणून नागपूरची ख्याती असली तरी समाजकंटक वेळोवेळी आपला उपद्रव दाखवितात. अनेकदा गंभीर गुन्हे घडवून ते कायदा आणि सुव्यवस्थेचीही स्थिती निर्माण करतात. नेत्यांच्या मागे लपून किंवा विविध पक्षांचे पांघरूण घेऊन ते पोलिसांपासून स्वत:ची कातडी वाचवून घेतात. निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यकाळात प्रतिस्पर्धी गटावर हल्ले करून नेत्यांसमोर स्वत:चा प्रभावही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या शहरातील काही गुंडांनी कळमना, पारडी आणि हिंगणा, एमआयडीसीत एकमेकांवर जोरदार हल्ले केले होते. प्रतिस्पर्ध्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. एकमेकांना जबर मारहाणही केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रचंड तणाव होता. याही वेळी विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नागपुरातील गुन्हेगारांनी गंभीर गुन्हे घडवून आपला प्रभाव दाखविण्यासाठी उपद्रव सुरू केला होता. त्यामुळे एप्रिल-मेदरम्यान उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळून आल्यासारखी झाली होती. निवडणुका तोंडावर असताना गुन्हेगारांनी वळवळ सुरू केल्याचे पाहून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक अॅक्शन प्लान आखला. त्यानुसार, गुन्हेगारांना त्यांची मूळ जागा दाखविण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुली सूट देण्यात आली. परिणामी, तडीपार, एमपीडीए, मकोका यासारख्या कारवाईचा शहरात धडाका लावण्यात आला. अवघ्या दोन महिन्यात ६,८६६ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली, तर १५५४ जणांना समजपत्र देण्यात आले.आंबेकरसह अनेकांचे मोडले कंबरडे
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:53 IST
अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या.
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन
ठळक मुद्देकुख्यात गुंडांची शहराबाहेर हकालपट्टी : अनेकांना डांबले कारागृहात४१ गुंडांवर एमपीडीए११ टोळ्यांवर मकोका६,८६६ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई१५५४ जणांना समजपत्र