शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 :छोटा ताजबागपासून मोहन मते यांच्या प्रचाराला प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 00:36 IST

भाजपचे दक्षिण नागपुरातील उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार पदयात्रेला बुधवारपासून शुभारंभ झाला. छोटा ताजबाग येथे दर्शन घेऊन मोहन मते यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.

ठळक मुद्देदक्षिण नागपुरात पदयात्रा : नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे दक्षिण नागपुरातील उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार पदयात्रेला बुधवारपासून शुभारंभ झाला. छोटा ताजबाग येथे दर्शन घेऊन मोहन मते यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले, माजी उपमहापौर तथा शिवसेना नेते शेखर सावरबांधे, शिवसेनेचे दक्षिण नागपूर प्रमुख राजू तुमसरे, नगरसेविका दिव्या धुरडे, मंगला खेकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रचाराला प्रारंभ केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. या प्रचार पदयात्रेमध्ये नेतेमंडळींसह नगरसेविका स्वाती आखतकर, स्नेहल बिहारे, भाजपचे मंडळ अध्यक्ष संजय ठाकरे, माजी नगरसेवक बळवंत जिचकार, रमेश सिंगारे, देवेंद्र दस्तुरे, प्रशांत कामडी, किशोर पेठे, विलास करांगळे, सुनील मानेकर, नाना आदेवार, अशिष वांदिले, विकास बाबरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.छोटा ताजबाग, आयुर्वेदिक ले-आऊट, भांडे प्लॉट, बापुनगर, मिरे ले-आऊट, कबीरनगर, गुरुदेवनगर, कीर्तीनगर, जगनाडे चौक, मंगलमूर्ती चौक, दत्त मंदिर अशा विविध ठिकाणी ही पदयात्रा जात असताना कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. दुपारी ओमनगर सुदामपुरी, नेहरूनगर या भागातील नागरिकांनी देखील मोहन मते यांच्या प्रचार यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना मोहन मते यांनी दक्षिण नागपूरच्या विकासाकरिता भारतीय जनता पार्टीने दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या कामाला प्राधन्यक्रम देऊन जनतेची सेवा करण्याची हमी त्यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिण