Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 10:49 PM2019-10-19T22:49:11+5:302019-10-19T22:49:35+5:30

प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Let's vote! | Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन

Maharashtra Assembly Election 2019 : चला मतदान करू या !मान्यवरांचे आवाहन

Next
ठळक मुद्दे नागपूरकर देणार साद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. शहर व जिल्ह्यातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी,अशी अपेक्षा आहे. यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले आहे.
आपलं एक एक मत देशाचे भवितव्य ठरवीत असतं. राज्यघटनेने सर्वांना समान मताचा अधिकार दिला आहे. तो अधिकार बजावणे प्रत्येक नागपूरकरांचे कर्तव्य आहे. नागपूरकर मतदानाचा उच्चांक गाठून हे म्हणणे खरे ठरवतील, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
 

कर्तव्य म्हणून मतदान करा
विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांनी अधिकार म्हणूनच नव्हे तर कर्तव्य म्हणून नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी मतदान करावे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे.
अभिजित बांगर, मनपा आयुक्त

लोकशाही बळकट करा
लोकशाही प्रक्रियेत मतदान ही सर्वोच्च शक्ती आहे. कर्मचारी व नागरिकांनी मतदानाचे परमकर्तव्य बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावावा.
शीतल तेली-उगले, महानगर आयुक्त, एनएमआरडीए

लोकशाहीला सुदृढ करा
लोकशाहीत प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे.
मिळालेल्या अधिकाराचा वापर २१ तारखेला प्रत्येकाने मतदान करून लोकशाहीला अधिक सुदृढ करावे
रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी

मतदान हक्क बजावून देशसेवा करा
संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावून देशसेवा करावी.
प्रा. आशिष मासूरकर, कुलगुरू पशु व मत्स्य विद्यापीठ

मतदान करून लोकशाही सुदृढ करा
लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा, विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना यासाठी प्रेरित करावे.
डॉ. काणे, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

निर्भयपणे मतदान करा
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या दडपणाला अथवा आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. कुणी काही धाक दाखवत असल्यास किंवा गैरप्रकार करीत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नागपूर

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Let's vote!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.