शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी साथ द्या : मल्लिकार्जुन खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:54 IST

देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देनागपूर दक्षिण-पश्चिममध्ये परिवर्तन घडवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे फुले-शाहू-आंबेडकर व गांधी यांच्या विचारधारेवर चालणारा काँग्रेस पक्ष तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर चालणारा भाजप या दोघापैकी एकाची निवड निवडणुकीत करावयाची आहे. देशाचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केले.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रातील जाटतरोडी येथे आयोजित काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. खरगे म्हणाले, आपली लढाई ही मुख्यमंत्र्यांशी नाही, त्यांच्या विचारधारेशी आहे. लहान पक्षांना मतदान करून मत विभागणी करू नका. भाजपने देशाचे वाटोळे केले. बेरोजगारी वाढली. मार्के टिंग करून भाजपा लोकांची दिशाभूल करीत आहे. दलित व मागासवर्गीयांनी काँंग्रेसला साथ द्यावी, आरक्षण मिळू नये म्हणून भाजपा प्रयत्न करीत आहे. सरकारी संस्था खासगीकरणाचे काम सुरू आहे. संविधान वाचविण्यासाठी जागे व्हा. बाबासाहेबांची विचारधारा अविरत चालू राहील, यासाठी एकत्र या.देशाचा जीडीपी कमी झाला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे. उद्योगात गुंतवणूक नाही. नवीन कारखाने नाहीत, रोजगार नाही. व्यवसाय बंद होत आहेत. बेरोजगारी वाढली. शेतकरी आत्महत्या वाढल्या. असे वास्तव असूनही मुख्यमंत्री आपल्या भाषणातून विकासाचा दावा करीत आहेत. भाषणामुळे लोकांचे पोट भरत नाही, तर यासाठी त्यांच्या दोन हाताला काम हवे असल्याची टीका खरगे यांनी केली. महाराष्ट्रातील निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाल्यास देशातील सत्ता परिवर्तनाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बाळासाहेब थोरात यांनी दिशाभूल करणाऱ्या भाजपचा पराभव करण्याचे आवाहन के ले. आशिष देशमुख यांनी प्रास्ताविकात भाजपचा खरपूस समाचार घेतला. संधी मिळाल्यास या क्षेत्राचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष रणजित देशमुख, अनिस अहमद, आशिष दुवा, संत भजनाराम, किशोर गजभिये, प्रफुल्ल गुडधे, दिलीप पनकुले, अलका कांबळे, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम