Maharashtra Assembly Election 2019 : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार : विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:02 AM2019-10-15T01:02:53+5:302019-10-15T01:03:12+5:30

नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली.

Maharashtra Assembly Election 2019 : Fight for Traders to solve problems: Vikas Thakre | Maharashtra Assembly Election 2019 : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार : विकास ठाकरे

Maharashtra Assembly Election 2019 : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार : विकास ठाकरे

Next
ठळक मुद्देसीताबर्डी येथे बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली.
पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांची सोमवारी सीताबर्डी, हनुमान गल्ली येथे व्यापाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना साथ देण्याचे आवाहन केले. याशिवाय प्रभाग क्रं. १५ मधील मुंडा देऊळ, सीताबर्डी येथून सुरू पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा ही टेंपल बाजार रोड, सीताबर्डी मेन रोड, मोदी नं. १ गल्ली, मोदी नं. २ गल्ली, मोदी नं. ३ गल्ली, तेलीपुरा, आनंदनगर, नेताजी मार्केट येथे पोहोचून कुंभारटोली येथे समाप्त झाली. या वेळी राजकुमार कमलाणी, राजेश जारगर, बबलू तिवारी, प्रशांत धुपे, सुरेश हेडाऊ, कैलास व्यास, अ‍ॅड. अक्षय समर्थ, विकास चिपुटवार, सुनील ढोले, बबलू चौहान, विकास कुर्यवंशी, अनिल यादव, जगदीश जोशी, हितेश त्रिवेदी, राजू पटेल, वंदना, पंकज कुमरे, पिंटू भोंगाडे, सूरज शर्मा, निखिल नायडू, चंदन पांडे, सोहम कोकर्डे इत्यादींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Fight for Traders to solve problems: Vikas Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.