शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूरकरांचे राहणीमान सुधारण्यावर भर देणार : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:14 IST

नागपूरकर जनतेचे राहणीमान उंचवावे, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असून, त्यांच्या राहणीमानात लक्षणीय वाढ करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसहकारनगर परिसरात नागरिकांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकर जनतेचे राहणीमान उंचवावे, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असून, त्यांच्या राहणीमानात लक्षणीय वाढ करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.शुक्रवारी सहकारनगर येथील विमानतळ परिसरातील नागरिकांसोबत तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत लहान बैठकांद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्कादरम्यान ते म्हणाले, दिल्ली सरकारच्या धर्तीवर महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन, त्या शाळांचे संगणकीकरण करून व संरचनेत वाढ करून शिक्षणाची गुणवत्ता वाढवू. शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवू.चांगल्या उपचारासाठी मोठ्या डॉक्टरांची चमू आणून व येथील कर्मचाऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण देऊ. महानगरपालिकेच्या डिस्पेन्सरीमध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलच्या सहाय्याने मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. गरीब रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक उपकरणांद्वारे सुपरस्पेशालिटी उपचार सेवा, दरवर्षी नि:शुल्क अभियान, कॅन्सरसह अन्य आजारांसाठी विशेष शिबिरे, व्यसनमुक्तीसाठी जनजागृती कार्यक्रम आदींचे नियोजन त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, काटोल फेस्टिव्हलच्या धर्तीवर नागपूर फेस्टिव्हल सुरू करून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहित करू. दीक्षाभूमी, ताजबाग, गुरुद्वारा, पुरातन मंदिरे यांचा तीर्थक्षेत्र म्हणून कायापालट करू. बेरोजगार युवकांना पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता व महिलांच्या लघुउद्योगांसाठी तीन वर्षे करमाफी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मोठ्या रोजगार निर्मितीसाठी मिहान, सेझ, एमआयडीसीमध्ये नवीन गुंतवणूक आणून नागपूरला औद्योगिक नगरी बनविण्याचा संकल्प डॉ. आशिष देशमुख यांनी केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम