शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी १७६ उमेदवारी अर्जांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:54 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देदाखल एकही नाही : निवडणूक विभागात कार्यकर्त्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. सर्वाधिक ३३ उमेदवारी अर्ज उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून नेण्यात आले तर सर्वात कमी ३ अर्ज उमरेड विधानसभा मतदार संघातून गेले.

विधानसभा निवडणुकीला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. निवडणूक अर्ज वितरित करणे आणि वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात असलेल्या शहरातील विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विभागीय कार्यालयात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एक उमेदवाराला चार अर्ज नेता येतात. पहिल्या दिवशी नागपूर शहरातील ११६ अर्ज गेले तर ग्रामीण भागातून ६० अर्ज गेले. परंतु एकानेही अर्ज दाखल केला नाही. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.नागपूर दक्षिण-पश्चिम - १५नागपूर दक्षिण : २३नागपूर पश्चिम : १५नागपूर पूर्व : १०नागपूर मध्य : २०उत्तर नागपूर : ३३कामठी : ७हिंगणा : १३उमरेड : ३काटोल : १०सावनेर : ९रामटेक : १८-----------------------एकूण १७६जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप 
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथककडून जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप आले आहे.दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ४ ऑक्टोबर ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. ४ ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ५ तारखेला अर्जाची छाननी होईल. ७ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर