शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेसमुळे बहुजन समाजाचे नुकसान झाले  : विवेक हाडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:56 IST

. काँग्रेसमुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाने बहुजन समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता बहुजन समाज पक्ष विधानसभेत जाऊन बाबासाहेंबाच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देरमाई मैदान जयताळा येथे जाहीर सभा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोनवेळा काँग्रेसमुळे पराभवाचा सामना करावा लागला. बाबासाहेबांना संविधान सभेत जाण्यापासून थांबविण्याबरोबरच हिंदू कोड बिलवरसुद्धा काँग्रेसने विरोध केला होता. काँग्रेसमुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाने बहुजन समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता बहुजन समाज पक्ष विधानसभेत जाऊन बाबासाहेंबाच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, बहुजन समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीकरिता झटणार असल्याचे विवेक हाडके यांनी सांगितले.रमाई मैदान जयताळा येथे अयोजित प्रचार सभेत हाडके भाजपावरसुद्धा ताशेरे ओढले. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन गेल्या पाच वर्षात फोल ठरले आहे. रस्ते आणि उड्डाण पूल बांधून भाजपा विकासाचे स्वप्न दाखवीत आहे. भाजप सरकारचे आरोग्य, रोजगार, शिक्षण याकडे कुठलेच लक्ष नाही. बहुजन समाजाने देशातील लोकांना मूलभूत समस्या सोडविण्यासाठी होत असलेला त्रास लक्षात घेता, अशा तमाम शोषित, पीडित जनतेला न्याय देण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार तोडून काँग्रेसने आपल्या विचारधारेचा परिचय दिला आहे. आज दलित, आदिवासी, ओबीसी व उत्तर भारतीय लोकांना बसपाकडून मोठी अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बसपा पूर्ण प्रयत्न क रेल. आज सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती, जमातीचा मोठा बॅकलॉग आहे. तो बॅकलॉग भरण्याचा प्रयत्न बसपा करेल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे मिळत नाही. ते पूर्ण करण्याचा बसपा प्रयत्न करेल. या सभेला ससानंद जामगडे,सुनंदा नितनवरे, अशोक डोंगरे, उमेश हाडके, मनोज राहाटे, सुधीर कडू, कमल गजभिये, राकेश गजभिये, शैलेंद्र कराडे, शिवाजीराव देशकर, अजय डांगे, मेघा हाडके, देवमन पाखिडे, सुमंत गणवीर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम