शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 21:51 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला.

ठळक मुद्देभाजप निवडणूक भावनात्मक करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला. भाजप कितीही भावनात्मक मुद्दे उपस्थित करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असला तरी काँग्रेस मात्र जनतेशी निगडित दैनंदिन मुद्यांवरच निवडणूक लढवेल आणि यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.खरगे आणि थोरात यांनी मंगळवारी प्रेस क्लब येथे संयुक्त पत्रपरिषद बोलावली होती. यावेळी खरगे यांनी राहुल गांधी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. लोक काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आम्ही येथील स्थानिक मुद्यावरच बोलत आहोत. महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. तो आता कितीतरी मागे गेला आहे. शेतकरी आत्महत्या विदर्भात सर्वाधिक होत आहेत. कृषी विकास दर हा नेहमीच साडेचार ते ५ टक्के राहिला आहे. परंतु तो खाली येऊन २.४ टक्केवर आला आहे. कृषी उत्पादनही घटले आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अपयशी ठरत आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे. हे मुद्दे आम्ही लोकांपुढे मांडत आहोत. लोकांनाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते सुद्धा परिवर्तनाच्या तयारीत आहेत.६० वर्षाचा हिशेब मागणारे त्यांचे केवळ पाच वर्षाचे रिपोर्ट कार्ड का सादर करीत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार जाहिरातबजी करून लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा दुप्पट होणारकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काँग्रेस महाआघाडीला चांगले यश मिळेल. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. नवीन रोजगार दूरच आहे तो रोजगारही हिरावला जात आहे. त्यामुळे लोकांनाच परिवर्तन हवे आहे. मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ४२ व ४१ असे होते. ते यंदा दुप्पट होतील, आणि काँग्रेस महाआघाडीचीच सरकार येईल, असा दावा केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातMediaमाध्यमे