शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या चुकीच्या धोरणांनी बजेट बिघडविले : आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:38 IST

महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसर्वसामान्य जनतेने मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदार संघात जनसंपर्क करीत असताना भाजप सरकारविरोधी जनआक्रोश सर्वत्र दिसून येत आहे. महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.सुभाषनगर, अंबाझरी ले-आऊट, डागा ले-आऊट, गांधीनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, तकिया, धंतोली या मार्गालगतच्या परिसरात आशिष देशमुख यांनी सोमवारी प्रचार केला. या जनसंपर्क दौऱ्यात गृहिणी, छोटे व्यापारी, बेरोजगार युवक-युवती, मजुरांनी त्यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी दंतेश्वरी व धनगरपुरा झोपडपट्टी, आॅरेंजसिटी, खामला येथे पदयात्रा व रात्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची जाहीर सभाही पार पडली.या सरकारने दक्षिण-पश्चिम क्षेत्राचा काहीच विकास केला नाही. फक्त घोषणा केल्या, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. नागपुरातील महिलांची सुरक्षा वाढवून सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे, गृहोद्योगासाठी विशेष प्रशिक्षण, गुन्हेगारीवर आळा, नागपूरमध्ये महिला पोलिसांची संख्या वाढविणे, घनकचºयाची इकोफ्रेंडली विल्हेवाट, दूषित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा, झोपडपट्टीमधील नाल्या, पाण्याचे लिकेज बंद करणे व रस्ते दुरुस्ती, उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती, नागपूर शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करून औद्योगिक नगरी व आर्थिक विकासावर भर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २१ व्या शतकातील जागतिक दर्जाच्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देणे, हा आपला संकल्प असल्याचे डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी जाहीर केले. २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनाचे उत्तर सरकारकडे नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम