शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

-तर वर्धा, भंडारा, रामटेक, काटोलपर्यंत महामेट्रो धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:47 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून आता महामेट्रोने लोकल मेट्रो रेल्वे सेवेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागपुरातून वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत पॅसेंजर रेल्वेऐवजी रेल्वे रूळाचा उपयोग करून महामेट्रोतर्फे लोकल मेट्रो रेल्वे चालविण्यात येईल. यामुळे प्रवाशांची वेळेची बचत आणि त्यांना सर्वोत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.

ठळक मुद्देबृजेश दीक्षित : मेट्रो रेल्वेचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून आता महामेट्रोने लोकल मेट्रो रेल्वे सेवेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागपुरातून वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत पॅसेंजर रेल्वेऐवजी रेल्वे रूळाचा उपयोग करून महामेट्रोतर्फे लोकल मेट्रो रेल्वे चालविण्यात येईल. यामुळे प्रवाशांची वेळेची बचत आणि त्यांना सर्वोत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.लोकमतशी चर्चेदरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे. त्यांनी या मुद्दावर बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या संदर्भात महामेट्रो अधिकाºयांच्या निरंतर संपर्कात राहील.२७ फेब्रुवारीला झालेल्या विविध विभागांच्या समीक्षा बैठकीत लोकल मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महामेट्रोतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार रेल्वे बोर्डाला दिला होता. प्रस्तावांतर्गत रेल्वेचे स्टेशन आणि रुळाचा उपयोग करून लोकल मेट्रो रेल्वे चालविण्याची महामेट्रोची योजना आहे. सध्या वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक आणि भंडारा या शहरांमध्ये नागपुरात पॅसेंजर धावते. पण त्याचा वेग फारच कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना संभाव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागतो. याच मार्गावर मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर लोकल प्रति तास १२० कि़मी. वेगाने धावू शकते. वेळेच्या बचतीसह प्रवाशांना एसीमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळेल. वेळ कमी लागणार असल्यामुळे रेल्वेचा स्लॉट सहजरित्या मिळेल. या सेवेचा रेल्वेच्या नियमित सेवेवर काहीही परिणाम होणार नाही. या प्रकल्पासाठी महामेट्रो रेल्वेला स्टेशन आणि रूळाच्या उपयोगासाठी भाडे देईल आणि रेल्वेचा खर्च महामेट्रो वहन करेल. त्यामुळे रेल्वेला फायदा होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर