शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांसह महामेट्रो प्रशासन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:04 IST

कोविडनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महामेट्रोतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रवासी आणि कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविडनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महामेट्रोतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.

मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामेट्रोतर्फे गाड्यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच गर्दी असलेल्या मेट्रो स्थानकची वारंवार स्वच्छता केली जाईल. क्रू कंट्रोल रूम, बेबी केअर रूम आणि स्टेशन कंट्रोल रूम याठिकाणी सतत गर्दी असते. तेथील खोल्या वारंवार स्वच्छ केल्या जातील. याव्यतिरिक्त मेट्रो कर्मचारी पीपीई कीटसह, मास्क आणि हॅण्डग्लोव्हज घालून कार्यरत असतील. तसेच केंद्र आणि राज्य शासनाने कोविड-१९ महामारीकरिता वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात येईल. शासनाने जारी केलेले निर्देश प्रवाशांना आणि मेट्रो कर्मचाऱ्यांना नियमित सांगण्यात येईल. कोविड-१९ संबंधित जागरुकता नियमितपणे मेट्रो स्टेशन आणि मेट्रो गाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या स्पीकरवरून घोषणेद्वारे केल्या जातील. तसेच मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशांकरिता सूचना फलक लावण्यात येतील.मेट्रो स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यात आले असून मेट्रो प्रवाशांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना पाळण्यास सांगितले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील.

टॅग्स :Metroमेट्रोcorona virusकोरोना वायरस बातम्या