शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 10:29 IST

महामेट्रो नागपूर स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘महाकार्ड’ची सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक वाहतुकीसाठी वापरनागरिकांचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट, प्रवाशांना सोपी, सोईस्कर, उपयुक्त ठरेल, याकारिता महामेट्रो सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोप्या व सहज पद्धतीने करता यावा, यासाठी स्मार्ट कार्ड चलनात असणे गरजेचे आहे. यासाठी महामेट्रो नागपूर पुढाकार घेत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘महाकार्ड’ची सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्याकरिता महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिका एकत्रित आले आहे. यांच्या संयुक्त करारानुसार एकाच कॉमन कार्डद्वारे सर्व फिडर सेवा आणि मेट्रो सेवा प्रवाशांना मिळणार आहे. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी महामेट्रोच्या ट्रायल रनसंबंधी झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्टेट बँक आॅफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत या कार्डाचे लोकार्पण करण्यात आले होते. आता हे कार्ड सर्वसामान्य नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे.कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच महाकार्ड ही एक अभिनव संकल्पना आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्पेसिफिकेशनच्या आधारावर हे कार्ड तयार करण्यात आले. ईएमव्ही (युरोपे, मास्टर, व्हिसा) पद्धतीवर आधारित आहे. नागरिकांना याद्वारे कुठेही सहजपणे, न थांबता प्रवास करता येणार आहे.घरापासून ते मेट्रो स्टेशन आणि परत मेट्रो स्टेशन ते आॅफिसपर्यंत उपयोगात येणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी या कार्डचा वापर होईल. जसे आॅटो, मोबाईल, बस आणि मेट्रो याठिकाणी कार्ड स्वाईप करून प्रवासी दर चुकविता येईल. यासाठी प्रत्येक वेळी पैशांची गरज पडणार नाही. इतकेच नव्हे तर रोजच्या जीवनोपयोगी वस्तूदेखील नागरिकांना ‘महाकार्ड’ने खरेदी करता येईल. तसेच शॉपिंग मॉल, सिनेमागृह, उपाहारगृह अशा विविध ठिकाणीदेखील हे कार्ड वापरता येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो