शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात महाबॅकलॉग

By admin | Updated: May 8, 2017 02:07 IST

नागपूरला एज्युकेशनल हब बनविण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरला एज्युकेशनल हब बनविण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. मात्र सरकारी अनास्था आणि विद्यापीठातील घाणेरड्या राजकारणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रिक्त पदांचा महाबॅॅकलॉग तयार होत आहे. सध्या एकूण ९४१ मंजूर पदापैकी ३७३ पदे रिक्त आहे. जुन अखेर यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे एज्युकेशनल हबची संकल्पना वास्तवात साकारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पदवी अभ्यासक्रमांना सत्र प्रणाली लागू झाल्यापासून विद्यापीठाचे काम आणखी वाढले आहे. विशेषत: प्राध्यापक व कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. मात्र प्रत्यक्षात कमी मनुष्यबळातच विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयात शिक्षकांची ४७ टक्के पदे रिक्त आहेत. तर तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची १५१ पदे रिक्त आहेत. तृतीय श्रेणीपेक्षा विद्यापीठात शिक्षकांची पदे जास्त प्रमाणात रिक्त आहेत. अशास्थितीत विद्यापीठाचा कारभार कसा चालेल व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे प्राप्त होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. नागपूर विद्यापीठात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या किती व कोणत्या जागा रिक्त आहेत, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. विद्यापीठातर्फे प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार विद्यापीठात शिक्षकांची एकूण ४६५ मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ २४३ पदे भरण्यात आली असून, २२२ पदे रिक्त आहेत. सहायक प्राध्यापकांची सर्वात जास्त ६८ पदे रिक्त आहेत तर सहयोगी प्राध्यापकांची ४६ पदे रिक्त आहेत. तृतीय श्रेणीत रिक्त पदांचे प्रमाण मोठे आहे. विद्यापीठात तृतीय श्रेणीची ४७६ मंजूर पदे आहेत. यापैकी ३२५ पदे भरली असून, १५१ म्हणजेच सुमारे ३१ टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये निम्न श्रेणी लिपिकांची ६४, उच्च श्रेणी लिपिकांची १५ तर निवड श्रेणी लिपिकांची १३ पदे आहेत. जर शिक्षक व तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची तुलना केली तर शिक्षकांची जास्त पदे भरण्याची गरज असल्याचे दिसून येते.