शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मदुराई-बिकानेर एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ : एसी नादुरुस्त झाल्यामुळे संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 9:10 PM

एसी नादुरुस्त झाल्यामुळे शुक्रवारी मदुराई-बिकानेर अनुव्रत एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावरील घटनादुसऱ्या कोचमध्ये केली प्रवाशांची व्यवस्था, गाडीला तासभर विलंब

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एसी नादुरुस्त झाल्यामुळे शुक्रवारी मदुराई-बिकानेर अनुव्रत एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला. एसी दुरुस्त होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेऊन तब्बल दोन वेळा चेनपुलिंग केले. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत घातल्यानंतर ही गाडी तब्बल तासभरानंतर पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.रेल्वेगाडी २२६३१ मदुराई-बिकानेर अनुव्रत एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी २.३९ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. या गाडीतील बी ९ कोचचा एसी नादुरुस्त झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होत होता. मार्गात सिरपूर कागजनगर, बल्लारशाह, चंद्रपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी एसी दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना पुढील रेल्वेस्थानकावर एसी दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटत होते. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी गाडी पुढील प्रवासाला निघाल्यानंतर चेनपुलिंग करून एसी दुरुस्त करण्याची मागणी केली. एसी दुरुस्त केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका करून तब्बल दोनवेळा चेनपुलिंग केली. प्रवासी चेनपुलिंग करीत असल्याचे समजताच स्टेशन संचालक दिनेश नागदेवे, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, आरपीएफचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक एस. पी. सिंह यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवासी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर बी ९ कोचमधील प्रवाशांची एसी २, एसी थ्री कोचमध्ये व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर दुपारी ३.३३ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी