शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  मध्य प्रदेशातील वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:49 IST

लहान भावाच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले. त्यांच्याजवळचे रोख ४० हजार आणि सोनसाखळी असा ९० हजारांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला.

ठळक मुद्देवर्दळीच्या भागात घटना : बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहान भावाच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले. त्यांच्याजवळचे रोख ४० हजार आणि सोनसाखळी असा ९० हजारांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला. मंगळवारी सकाळी बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्पतरू हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. राजकुमार गोविंदराव अग्रवाल (वय ६४) असे पीडित वृद्धाचे नाव आहे.अग्रवाल शिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या लहान भावाच्या उपचारासाठी ते नागपुरात आले होते. प्रतापनगर सिमेंट मार्गावरील गायत्री भोजनालयाजवळ चहा घेऊन ते कल्पतरू हॉस्पिटलकडे जात असताना मंगळवारी सकाळी ९.२० वाजता त्यांना दोन लुटारूंनी रोखले. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही गांजाची तस्करी करता, असे म्हणत त्यांनी अग्रवाल यांना तलाशी घ्यायची आहे, असे म्हटले. अग्रवाल यांनी विरोध केला असता लुटारूंनी त्यांना आपले बनावट ओळखपत्र दाखवले. त्यांना धमकावल्यानंतर अग्रवाल यांच्या खिशातील ४० हजार रुपये काढून घेतले. या भागात मोठ्या प्रमाणात लुटमार सुरू आहे, असा धाक दाखवून लुटारूंनी अग्रवाल यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी काढून रुमालात बांधून ठेवा, असे म्हटले. त्यानंतर स्वत:च अग्रवाल यांच्या हातातून रुमाल आणि सोनसाखळी घेऊन त्याची गाठ पाडताना लक्ष विचलित करून लुटारूंनी रोख तसेच सोनसाखळी लंपास केली. रिकाम्या रुमालाची गाठ बांधून ती अग्रवाल यांना सोपवून लुटारू पळून गेले. काही वेळेनंतर अग्रवाल यांनी रुमालाची गाठ उघडली असता त्यांना त्यात काहीच आढळले नाही. लुटले गेल्याचे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार राजू बावणे यांनी गुन्हा दाखल केला असून, लुटारूंचा शोध घेतला जात आहे.चार दिवसातील दुसरी घटनाअत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे वृद्ध व्यक्तींना फसवून त्यांची रक्कम लुटल्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. १९ आॅक्टोबरला पंचशील चौकात कोल्हापूर जिल्ह्यातील एका वृद्धाला अशाच प्रकारे पोलीस असल्याचे सांगून एका आरोपीने लुटले होते. त्याचा शोध लागायचा असतानाच आता पुन्हा ही घटना घडली.

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिस