शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील व्यक्तीची नागपुरात हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:03 IST

केसाचा उपचार करण्याच्या बहाण्याने नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीची त्याच्या भाडेकरूने दगडाने ठेचून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हा थरार घडला.

ठळक मुद्देभाडेकरूने केला घात : कळमन्यातील आदर्शनगरात थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केसाचा उपचार करण्याच्या बहाण्याने नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीची त्याच्या भाडेकरूने दगडाने ठेचून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हा थरार घडला. रामलाल दद्दीप्रसाद जैस्वाल (वय ४१) असे मृताचे नाव आहे. ते मध्य प्रदेशातील रिवा येथे राहत होते.रामलाल जैस्वाल मूळचे नागपूरचे असून, कळमन्यातील आदर्शनगरात त्यांचे स्वत:चे घर आहे. त्यांना दोन पत्नी असल्याचे पोलीस सांगतात. येथील घर आरोपी अंकुश जैस्वाल याला भाड्याने देऊन ते रिवा येथे राहायला गेले. केसाचा उपचार करण्यासाठी ते दोन दिवसांपूर्वी नागपुरात आले. एका नातेवाईकाकडे मुक्कामी थांबलेले जैस्वाल भाडेकरू अंकुशकडे शुक्रवारी रात्री घरभाडे मागण्यासाठी गेले. त्यांनी त्याला घरभाडे मागितले. अंकुशने घरभाडे तुमच्या पहिल्या पत्नीला देतो, असे सांगून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. तुला घर मी भाड्याने दिले, तू मला न विचारता पत्नीला घरभाडे कसे देतो, अशी विचारणा करून जैस्वाल यांनी अंकुशला खडसावले. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढत गेला आणि अंकुश तसेच त्याच्या साथीदारांनी रामलाल जैस्वाल यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर दगडाने ठेचून त्यांना ठार मारले. आरडाओरडीमुळे मोठा जमाव जमला. मात्र, रामलाल यांची कुणी मदत केली नाही. आरोपी पळून गेल्यानंतर कळमना पोलीस तेथे पोहचले. त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपी अंकुश आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.कळमना निरंकुशदेशभरात प्रसिद्ध असलेल्या कळमना मार्केटच्या परिसरातच कळमना पोलीस ठाणे आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे कळमन्यातील गुंडगिरी उफाळून आली आहे. तृतीयपंथी चमचमच्या हत्याकांडापासून येथे गंभीर गुन्हे घडण्याची मालिकाच लागली आहे. व्यापाऱ्यावर हल्ले करून लुटण्याचेही प्रकार नेहमीच घडतात. कळमना पोलिसांनी कोणतीही मोठी कामगिरी बजावल्याची अलीकडे नोंद नाही. अवैध धंदे वाढले आहेत. मार्केट परिसरातच गुन्हेगार, चोर-भामटे फिरताना दिसतात. गुन्हेही करतात. लाखोंच्या सुपारीचे वारेन्यारे येथूनच होते. कळमन्याचे ठाणेदार आणि पोलीस नेमके काय करतात, तोच तपासाचा विषय झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून