शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळवून नेले, गर्भधारणेनंतर वाऱ्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 15:36 IST

एका भामट्याने १५ वर्षीय मुलीला प्रेमजाळ्यात अडकवून पळवून नेले. तिला पत्नीसारखे वागवून तिचे शारीरिक शोषण केले. तिला गर्भधारणा झाल्याने आरोपीने तिला झिडकारणे सुरू केले.

ठळक मुद्देपाचपावलीत गुन्हा, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १५ वर्षांच्या मुलीला प्रेमजाळ्यात अडकवून एका भामट्याने तिला आईच्या घरून पळवून नेले. तब्बल चार महिने तिला पत्नीसारखे वागवून गर्भधारणेनंतर लग्नाला नकार दिला. हंसापुरीतील कसानपुऱ्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करून आरोपी ईस्लाम खान नासिर खान (वय २१) याला अटक केली आहे.

पीडित मुलगी मूळची अकोल्याची आहे. तीन वर्षांपूर्वी तिचे कुटुंब नागपुरात राहायला आले. मुलीला वडील नाहीत. तिची आई मिळेल ते काम करते. आरोपी ईस्लाम खानची या मुलीसोबत ओळख झाल्यानंतर त्याने तिला प्रेमपाशात ओढले. त्यात तिला अडकवल्यानंतर २५ मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तब्बल चार महिने ईस्लामने तिला पत्नीसारखे वागवून तिचे शारीरिक शोषण केले. तिला गर्भधारणा झाल्याने आरोपीने तिला झिडकारणे सुरू केले.

ही बाब मुलीच्या आईला माहीत झाल्यानंतर तिने आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांची समाजातील काही मंडळींच्या माध्यमातून समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, ईस्लाम दाद देत नसल्याने पीडित मुलीने रविवारी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय श्रीनिवास दराडे यांनी तपास करून पोक्सो कायद्यानुसार, अपहरण करून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी ईस्लामला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदा