शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मॅडम अडकल्या नाशकात, ५३ कर्मचारी पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 20:17 IST

पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक आणि मध्यवर्ती संग्रहालया(अजब बंगला)च्या अभिरक्षक जया वाहणे लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये अडकल्या. परिणामत: या दोन्ही कार्यालयातील सुमारे ५३ कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अडला आहे.

ठळक मुद्देअजब बंगला, पुरातत्त्व विभागातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक आणि मध्यवर्ती संग्रहालया(अजब बंगला)च्या अभिरक्षक जया वाहणे लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये अडकल्या. परिणामत: या दोन्ही कार्यालयातील सुमारे ५३ कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अडला आहे. बिलावर स्वाक्षरीच न झाल्याने एप्रिल महिन्याचाही पगार होण्यासंदर्भात अनिश्चितता व्यक्त होत आहे.येथील अजब बंगलामध्ये ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात २३ कर्मचारी नियमित असून, १० कर्मचारी बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त आहेत, तर पुरातत्त्व विभागामध्ये २० कर्मचारी आहेत. मध्यवर्ती संग्रहालय असलेल्या अजब बंगलामध्ये वाहणे या अभिरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या स्वाक्षरीनेच कर्मचाऱ्यांचे पगार निघतात. वाहणे यांचे कुटुंबीय नाशिकला असल्याने त्या नेहमीच स्वगावी जात असतात. अशातच २० मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या काळात त्या नाशिकमध्ये होत्या. तेव्हापासून त्या नागपुरात परत येऊ शकल्या नाही. परिणामत: मार्च महिना उलटून गेला तरी त्यांची ईएफटी बिलावर स्वाक्षरी झाली नाही. यामुळे मार्च महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन निघू शकले नाही. आता एप्रिल संपायलाही केवळ एक आठवडा शिल्लक आहे. या महिन्याचेही ईएफटी बिल न गेल्याने या महिन्याचेही पगार निघण्याची शक्यता राहिलेली नाही.ही परिस्थिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अलीकडेच कर्मचाऱ्यांनी पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाच्या संचालकांकडे एक अर्ज पाठविला. त्यात ही परिस्थिती मांडली आहे. वाहणे रुजू होईपर्यंत विशेष बाब म्हणून येथील सहायक अभिरक्षक वि. ना. निट्टूरकर यांच्याकडे तात्पुरता प्रभार सोपवावा आणि त्यांच्या माध्यमातून पगारपत्रकावर स्वाक्षऱ्या करून ईएफटी बिल सादर केले जावे, अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेतच आहेत.माझी मुलगी आणि सासू नाशिकला असल्याने आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे अडकले. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची काळजी मलाही आहे. अंतर लांब असल्याने आणि येण्याची व्यवस्था नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठांकडे ही अडचण मांडली आहे.- जया वाहणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग, नागपूर

टॅग्स :Nagpur Central Museumनागपूर मध्यवर्ती संग्रहालयEmployeeकर्मचारी