शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

यंत्र आले, पण निधी नाही : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 20:35 IST

वैद्यकीय यंत्राच्या खरेदीला मान्यता मिळताच शासनाचा निधी प्रथम रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. नंतर यंत्र खरेदीचे अधिकार असलेल्या हाफकिन महामंडळाकडे निधी हस्तांतरित केला जातो. नंतर यंत्राची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णालयाला यंत्र प्राप्त होते. ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याच्या उलटे झाले आहे. निधी न मिळता प्रस्तावित यंत्र आल्याने ‘सुपर’ अडचणीत सापडले आहे.

ठळक मुद्दे६ व्हेन्टिलेटर, ११ पेसमेकर यंत्र पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय यंत्राच्या खरेदीला मान्यता मिळताच शासनाचा निधी प्रथम रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. नंतर यंत्र खरेदीचे अधिकार असलेल्या हाफकिन महामंडळाकडे निधी हस्तांतरित केला जातो. नंतर यंत्राची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णालयाला यंत्र प्राप्त होते. ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याच्या उलटे झाले आहे. निधी न मिळता प्रस्तावित यंत्र आल्याने ‘सुपर’ अडचणीत सापडले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्याच्या स्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी व एन्डोक्रेनोलॉजी या आठ विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. यात आणखी नव्या विभागाची भर पडावी व रुग्णांना अद्यावत उपचार मिळावे म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. यातील दर वर्षी २० कोटी रुपये खर्च केले जाणार होते. त्यानुसार सुपर स्पेशालिटी प्रशासनाने २०१७-१८ साठी आवश्यक यंत्र सामुग्रीचा प्रस्ताव हाफकिन महामंडळाकडे पाठविला. परंतु पहिल्या टप्प्यातील २० कोटी न मिळताच यंत्र यायला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात सहा फोर्टेबल व्हेन्टिलेटर व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ११ पेसमेकर आले. ‘एमआरआय’ व ‘डिजिटल रेडिओग्राफी’ यंत्रही लवकरच उपलब्ध होणार आहे. जे यंत्र उपलब्ध झाले, ते स्थापन करण्याचा संबंधित कंपनीने तगादा लावणे सुरू केले आहे. परंतु निधीच मिळाला नसताना यंत्र कसे स्थापन करणार, या अडचणीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सापडले आहे. सूत्रानूसार, यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संपर्क साधणार आहे. परंतु तूर्तास दोन्ही यंत्र रुग्णालयात पडून आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलGovernmentसरकार