शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

लक्झरी वाहन चोरांची टोळी पोलिसांच्या हाती : फॉर्च्युनर, एसयुव्हीसह चार वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:15 IST

कार आणि लक्झरी वाहनांची चोरी करणारी आंतराज्यीय टोळी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली. त्यांच्याजवळून फॉर्च्युनर एसयुव्हीसह चार वाहने जप्त केली आहेत.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार आणि लक्झरी वाहनांची चोरी करणारी आंतराज्यीय टोळी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली. इमरान खान इस्माईल खान (३८) रा. सुफियाननगर, अमरावती आणि विनोद शंकरराव गिऱ्हे (४०) मूर्तिजापूर, अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्याजवळून फॉर्च्युनर एसयुव्हीसह चार वाहने जप्त केली आहेत.या टोळीचे मुख्य सूत्रधार उदय मारुती पाटील रा. कोल्हापूर आणि घाटकोपर मुंबई येथील जैनुद्दीन शाह तथा जलालुद्दीन शाह हे आहेत. ही टोळी अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. उदय पाटीलविरुद्ध मुंबई, पुणे आणि ठाणे येथे वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तेथे पोलिसांच्या नजरेत आल्याने उदयने विदर्भाकडे लक्ष वेधले. त्याच्या टोळीने नागपूर, अमरावती आणि इर शहरांमध्ये आपले जाळे पसरविले. त्याच्या टोळीत शहरातील गुन्हेगारही जुळलेले आहेत.ही टोळी स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने वाहन चोरी करते. वाहन चोरण्याचे काम इमरान करतो. कार चोरून तो अमरावतीला फरार होतो. उदयने सांगितलेल्या लोकांकडे तो चोरलेले वाहन सोपवतो. अमरावती येथून चोरी केलेली वाहने सोलापूर, कोल्हापूर आदी शहरांद्वारे मुंबई येथे जैनुद्दीन आणि जलालुद्दीनजवळ पोहोचतात. दोघेही आॅटो डीलर व कबाडी व्यवसायी आहेत. ते वाहनाचे इंजिन आणि चेसीस नंबर बदलवायचे. बोगस दस्तावेजाच्या मदतीने आरटीओतून वाहन नोंदणीकृतसुद्धा करून देत होते. बोगस दस्तावेज बनवण्याचे काम सोलापूर येथील अतिकउर्रहमान हा करतो. यानंतर ग्राहकांना वाहनांची विक्री केली जाते. ही टोळी लक्झरी वाहनांचीच चोरी करते. यामुळे वाहने लवकरच विकल्या सुद्धा जातात.अलीकडेच शहरातून चार चाकी वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांना तपासात या टोळीचा हात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून इमरान व विनोदला पकडले. त्यांनी इतर साथीदारांचीही माहिती दिली. त्यांच्याजवळून ४६ लाख रुपये किमतीची फॉर्च्युनरसह चार वाहने जप्त करण्यात आली. गेल्या सहा महिन्यात शहरातून १२ चार चाकी वाहने चोरीला गेली होती.ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी.एस. खंडाळे, पीएसआय चौरसिया, कर्मचारी रवींद्र गावंडे, नरेंद्र ठाकूर, प्रवीण रोडे, सागर ठाकरे, कुणाल मसराम, सुहास शिंगणे, सुरज भोंगाडे, आशिष पाटील यांनी केली.

टॅग्स :carकारtheftचोरीArrestअटक