शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एमबीबीएस अ‍ॅडमिशनचे आमिष : दहा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:26 IST

देशातील सर्वात मानाचे वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेल्या सेवाग्राम (वर्धा) येथील म. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची अ‍ॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका टोळीने हरियाणातील व्यक्तीला १० लाखांचा गंडा घातला. ६ ते २६ जुलै दरम्यान घडलेल्या या बनवाबनवीची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहरियाणातील व्यक्तीला फसवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सर्वात मानाचे वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेल्या सेवाग्राम (वर्धा) येथील म. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची अ‍ॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका टोळीने हरियाणातील व्यक्तीला १० लाखांचा गंडा घातला. ६ ते २६ जुलै दरम्यान घडलेल्या या बनवाबनवीची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.गोविंद राम शर्मा (वय ४८) असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते फरिदाबाद, हरियाणा येथील रहिवासी आहेत. त्यांना चिराग नामक मुलगा असून, त्याला डॉक्टर बनविण्याचे गोविंद शर्मा यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी शर्मा कुटुंबीय अनेक दिवसांपासून आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत. एमबीबीएसला प्रवेश मिळवण्यासाठी चिरागने पूर्वपरीक्षा दिली मात्र त्यात अपेक्षित महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला नाही. दरम्यान, ६ जुलैला त्यांच्या मोबाईलवर 8987086065 या नंबरवरून फोन आला. आपण रतन राय बोलतो, असे आरोपीने सांगितले. चिरागला सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवून देतो, त्यासाठी १० लाख रुपये खर्च येईल, असे कथित रतन रायने सांगितले. मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न घेऊन जगणाºया शर्मा दाम्पत्याने प्रारंभिक चौकशी केल्यानंतर रक्कम घेऊन नागपूर गाठले. गुरुवारी त्यांना सोमलवाड्यातील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आले. तेथून आरोपी रतन रायने त्यांना पॅरेडाईज सोसायटीतील एका पॉश घरी नेले. हे आपलेच आहे, असे सांगून आरोपीने शर्मा दाम्पत्याचा विश्वास जिंकला. पैसे दिल्यानंतर राय आपल्या मुलाची अ‍ॅडमिशन एमबीबीएसला करून देईल, असा विश्वास बसल्याने शर्मा दाम्पत्याने रॉयने पाठविलेल्या माणसांच्या हाती १० लाखांची रक्कम सोपवली. ती रक्कम ताब्यात घेताच आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मोबाईल नंबर बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.देशभर रॅकेटअशा प्रकारे फसवणूक करणाºया रॅकेटचे नेटवर्क देशभर पसरले असून, लोकमतने यापूर्वीही या रॅकेटच्या फसवणुकीचे किस्से प्रकाशित केले आहे. या रॅकेटने आतापर्यंत शेकडो जणांची अशी फसवणूक केली आहे. तीन महिन्यांपूर्वी सीताबर्डी ठाण्यातही अशाच प्रकारे गुन्हा दाखल झाला होता, हे विशेष !

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी