शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

'लकी ड्रॉ' काढून खाऊ गल्लीत डोम वाटप : ५ जानेवारीला उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:42 AM

मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित असलेली खाऊ गल्ली ५ जानेवारीला सुरू होत आहे. येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु यासाठी ७२ अर्ज आले आहेत. यामुळे निर्माण झालेला डोम वाटपाचा पेच सोडविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्दे ३२ डोमसाठी आले ७२ अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित असलेली खाऊ गल्ली ५ जानेवारीला सुरू होत आहे. येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु यासाठी ७२ अर्ज आले आहेत. यामुळे निर्माण झालेला डोम वाटपाचा पेच सोडविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ काढण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.खाऊ गल्लीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार विक्रे त्यांना दरमहा ५ हजार रुपये भाडे व ५ हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागतील. मागील काही वर्षांत खाऊ गल्लीची दुरुस्ती झालेली नव्हती. उभारण्यात आलेल्या डोमचे छत जागोजागी जीर्ण झाले होते. तसेच फूटपाथ व पायऱ्यांची दुरुस्ती, पार्किंग सुविधा अशी कामे अंतिम टप्प्यात आहेत.खाऊ गल्ली येथे होणारी गर्दी विचारात घेता, गांधीसागर तलावाच्या एका बाजूला पार्किंग सुविधा केली जाणार आहे. महापौर संदीप जोशी यांच्या निर्देंशानुसार, खाऊ गल्ली येथे आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात आली. दरम्यान, प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना खाऊ गल्ली ५ जानेवारीपर्यंत उद्घाटनासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले.महापौरांच्या ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’, ‘ ब्रेकफास्ट विथ मेयर’ या कार्यक्रमांमध्ये खाऊ गल्लीसंदर्भात नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी दौरा करून खाऊ गल्लीचे निरीक्षण केले. यावेळी खाऊ गल्लीतील पार्किंगमधील तुटलेले फ्लोरिंग तातडीने दुरुस्त करणे, आय ब्लॉक दुरुस्ती, नागरिकांसाठी वॉटर एटीएम, परिसरातील पथदिवे तातडीने सुरू करून रेलिंगला लागून असलेली झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले होते.खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या राहणार आहे. ही बाब लक्षात घेता तलावाच्या एका बाजूला पार्किंग व्यवस्था क रण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfoodअन्न