शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरीच्या अगोदर काढला जात होता सिलिंडरमधून एलपीजी गॅस, तुम्हीदेखील तपासून घ्या वजन

By योगेश पांडे | Updated: July 30, 2024 14:28 IST

सिलिंडर एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल : सजग ग्राहकामुळे उघडकीस आला गोरखधंदा

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एलपीजी सिलिंडर डिलिव्हर करण्याअगोदर त्यातून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून त्यांची परस्पर विक्रीचे रॅकेट समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सिलिंडर एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरी सिलिंडर आल्यानंतर नागरिक ते विश्वासाने घरी ठेवून घेत होते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना दोन ते तीन किलो कमी वजनाचे सिलिंडर पुरविण्यात येत होते. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

सजग ग्राहक दयासागर सुरेशराव चव्हाण (४३, गिट्टीखदान) यांच्या सतर्कतेमुळे हा गोरखधंदा उघडकीस आला. त्यांचा एचपी एलपीजी सिलिंडर वितरक रविनगरातील गांधी गॅस एजन्सी आहे. त्यांनी ऑनलाईन माध्यमातून सिलिंडर बुक केला होता. काही महिन्यांपासून त्यांना घरी येणाऱ्या सिलिंडरचे वजन कमी असल्याचे वाटत होते. २७ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांना सिलिंडरच्या गाडीचा आवाज आला. त्यांनी बाल्कनीतून खाली पाहिले असता दोन कर्मचारी नळीच्या सहाय्याने रिकाम्या सिलिंडरमध्ये भरलेल्या सिलिंडरमधून गॅस भरत होते. त्यानंतर ते कर्मचारी चव्हाण यांच्या घरी आले व सिलिंडर डिलिव्हर केले. चव्हाण यांनी वजन केले असता ते तीन किलो कमी भरले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना पूर्ण वजनाचे सिलिंडर दिले. मात्र चव्हाण यांना हा प्रकार खटकला. त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलवून त्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. त्यांची नावे रमेश गोदारा (३५, जगदीशनगर, गिट्टीखदान) व सुदेंदर भाखरराम जानी (२१, जगदीशनगर) अशी होती. दोघेही मुळचे राजस्थानमधील आहेत. हाय प्रेशर रेग्युलेटरच्या माध्यमातून प्रत्येक सिलिंडरमधून थोडा गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत होतो, अशी त्यांनी कबुली दिली. त्यांच्या गाडीत त्यावेळेला एचपी कंपनीचे २० भरलेले सिलिंडर, सहा रिकामे सिलिंडर व ५ अर्धवट भरलेले सिलिंडर होते. चव्हाण त्यांना घेऊन गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहोचले व तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वजन तपासणे अत्यावश्यकअनेक ग्राहकांकडून सिलिंडरचे वजन कमी असल्याची तक्रार करण्यात येते. त्यामुळे सिलिंडर घरी आल्यावर त्याचे वजन तपासून घेणे अत्यावश्यक ठरते. संबंधित प्रकरणात प्रत्येकच सिलिंडरमधून एलपीजी गॅस बाहेर काढण्यात येत होता. हा प्रकार कधीपासून सुरू होता व गॅस एजन्सीतून यात आणखी कोण सहभागी आहे याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर