शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 11, 2026 23:41 IST

Nagpur LPG Crisis: नागपुरात तिन्ही सरकारी तेल कंपन्या आणि खासगी कंपन्यांच्या जवळपास ६० गॅस एजन्सींमध्ये सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.

-मोरेश्वर मानापुरे, नागपूरकेंद्र आणि राज्य सरकारकडून सिलेंडरचा ७० टक्के पुरवठा सुरळीत झाल्याचे छातीठोकपणे सांगितले जात असले, तरी नागपुरातील वास्तव मात्र पूर्णपणे वेगळे आहे. शहरातील तिन्ही सरकारी तेल कंपन्या आणि खासगी कंपन्यांच्या जवळपास ६० गॅस एजन्सींमध्ये सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, ग्राहकांना एका सिलेंडरसाठी तब्बल ४० दिवस वाट पाहावी लागत असून, याच परिस्थितीचा फायदा घेत काळ्या बाजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.

२५ दिवसांची अट अन् १५ दिवसांची वेटिंग

नागपूरकर ग्राहकांसाठी घरगुती सिलेंडर मिळवणे आता युद्ध जिंकण्यासारखे झाले आहे. सध्याच्या नियमानुसार, एकदा बुकिंग केल्यानंतर पुढच्या २५ दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग करता येत नाही. त्यात भर म्हणजे, बुकिंग केल्यानंतर प्रत्यक्षात सिलेंडर घरी येण्यासाठी पुन्हा १५ दिवस लागतात. म्हणजेच, एका सिलेंडरसाठी ग्राहकांना ४० दिवसांचा कालावधी लागत आहे. जर पुरवठा सुरळीत आहे, तर ही ‘२५ दिवसांची जाचक अट’ सरकार का काढत नाही? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

व्यावसायिकांचे कंबरडे मोडले; ५ हजारात सिलेंडर!

व्यावसायिक सिलेंडर ग्राहकांची स्थिती तर अधिकच गंभीर आहे. लग्नकार्य आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी कॅटरर्सना दररोज ३ ते ४ सिलेंडरची आवश्यकता असते. मात्र, गॅस एजन्सीकडून एवढा पुरवठा होत नसल्याने त्यांना काळ्या बाजाराकडे वळावे लागत आहे. 

१९ किलोचे व्यावसायिक सिलेंडर काळ्या बाजारात चक्क ५ हजार रुपयांना विकले जात आहे. अनेक घरगुती ग्राहकांना गरजेपोटी अडीच ते तीन हजार रुपयांना गॅस सिलेंडर खरेदी करावा लागत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Faces LPG Shortage: Government Claims Fail, Citizens Await Cylinders.

Web Summary : Nagpur grapples with severe LPG cylinder scarcity, contradicting government assurances. Residents face 40-day waits, fueling black market prices. Commercial cylinders are sold for ₹5,000.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईCrude Oilखनिज तेलnagpurनागपूर