प्रियकराने प्रेयसीसमोर लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:59 PM2020-02-12T22:59:20+5:302020-02-12T23:02:34+5:30

हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा मैल येथे एका प्रियकराने प्रेयसीसमोर गळफास लावून मृत्यूला कवटाळले.

The lover committed suicide by hanging before his girlfriend | प्रियकराने प्रेयसीसमोर लावला गळफास

प्रियकराने प्रेयसीसमोर लावला गळफास

Next
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या चौदामैल येथील घटना : तिचे प्रयत्न अपुरे ठरले

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर ) : हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा मैल येथे एका प्रियकराने प्रेयसीसमोर गळफास लावून मृत्यूला कवटाळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रणय देवीदास मोरे (२६). रा.वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. दोन दिवसावर व्हॅलेंटाईन डे आला असताना बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार प्रणय हा भाड्याने चौदामैल येथे सुनील बोरकर यांच्या घरी राहत होता. तो चौदामैल येथील उडान कंपनी येथे कार्यरत होता. त्याची प्रेयसी ही सुद्धा वर्धा येथील राहणारी आहे. ती लखनौ, उत्तर प्रदेश येथे गेली होती. तिला फोन करून त्याने बुधवारी चौदामैल येथील रूमवर बोलावले होते. गत दोन वर्षांपासून हे प्रेमप्रकरण सुरू होते. परंतु प्रणय हा तिच्यावर संशय घेत होता. बुधवारी त्याने तिला इतरांशी बोलण्यास मनाई केली. याच विषयावर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने मृताने तिच्यासमोर तार गळ्याला बांधून फॅनला लटकला. यावेळी तिने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची शक्ती कमी पडली. तिने आरडाओरडसुद्धा केली. परंतु प्रणयचे राहणे तिसऱ्या माळ्यावर असल्याने घरमालकीण व नागरिक येईपर्यंत त्याने फाशी लावली होती. त्यानंतर त्या युवतीने मृताच्या कंपनीत फोन लावून ही माहिती दिली. कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रणयला ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात एएसआय निरंजन गवई, पोलीस हवालदार प्रकाश उईके, पवन वाघमारे करीत आहेत.

Web Title: The lover committed suicide by hanging before his girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.