शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे प्रेमविवाहातून मुलाच्या मामाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:55 IST

प्रेमविवाह केल्यामुळे वधूपक्षाकडील मंडळींनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या बचावासाठी धावलेल्या त्याच्या मामावरही वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी होऊन तरुणाच्या मामाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देतीन जण जखमी, कामठी शहरात तणाव, २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमविवाह केल्यामुळे वधूपक्षाकडील मंडळींनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या बचावासाठी धावलेल्या त्याच्या मामावरही वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी होऊन तरुणाच्या मामाचा मृत्यू झाला. या घटनेत तरुणाच्या भावासह आजी - आजोबाही जखमी झाले आहे. कामठीच्या रामगड भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर १२.३० वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांची अतिरिक्त कुमक, क्युआरटी (क्वीक रिस्पॉन्स पथक) तैनात करण्यात आले. त्यामुळे संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली.इकबाल जमील शेख (३७, रा. रामगड, कामठी) असे मृताचे नाव असून, या हल्ल्यात मुलाची आजी जरीन बी (६५), आजोबा जमीर शेख (७०) व शेख अल्ताफ शेख जमील, तिघेही रा. रामगड, कामठी हे जखमी झाले असून, त्यांच्यावर कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सय्यद इरफान शेख (२३, रा. रामगड, कामठी) याने परिसरातील तरुणीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम असूनही दोघांच्या कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी सावनेरात वर पक्षाच्या उपस्थितीत त्यांनी लग्नही केले. त्यानंतर पाच दिवसांआधीच तो कामठीत नववधूसह परतला. त्यानंतर गुरुवारी (दि. १५) सय्यदच्या आईने नववधूला तिच्या माहेरी पोहोचविले. तिच्या कुटुुंबीयांची समजूत काढून दोघांचेही रीतीरिवाजाप्रमाणे लग्न लावून देण्याची सूचना केली.दरम्यान, सोमवारी (दि. १९) रात्री ११ वाजताच्या सुमारास नववधूच्या कुटुंबीयांनी सय्यदच्या कुटुंबीयांशी भांडणाला सुरुवात केली.

परिसराला छावणीचे स्वरूपया घटनेमुळे रामगड भागात तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रमेश परदेशी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून लगेच अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सय्यदच्या घराजवळ दिवसभर पोलीस बंदोबस्त होता.

आरोपींची नावेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये नवाब रहमान शेख (४५), सलमान नवाब शेख (२०), समीर नवाब शेख (१८), इस्माईल अजिज खान (३५), रज्जाक अजिज खान (२८), सईद अजिज खान (३०), जब्बार रेहमू खान, खुर्शीद हुसेन शेख (४५), शेख सिकंदर (२४), फिरोज (२२), नसुरू (२६), काल्या ऊर्फ मुस्तफा खान (२३), काल्याचा मोठा भाऊ, गोलू (२८), चाँद खान (३०), चाँदचा भाऊ, उस्मान खान (२५), नजर मोहम्मद खान (१९), जहूर खान, शेख अलीम मुस्तफा (५९), शेख साबीर इब्राहिम (१९), काल्या ऊर्फ मोहम्मद रफीक शेख (४६) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा