शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, वितुष्ट आणि गुन्हा ! चंद्रपूरच्या तरुण-तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:58 IST

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमात वितुष्ट आल्यानंतर चंद्रपूरच्या प्रियकराने त्याच्या नवीन मैत्रिणीला घेऊन नागपूर गाठले. येथे होस्टेलमध्ये राहणाऱ्या आधीच्या प्रेयसीला बाहेर बोलवून नव्या मैत्रिणीसोबत ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून मारहाण करून तिचा विनयभंग केला.

ठळक मुद्देनवीन मैत्रिणीची ओळख करून देताना जुनीला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमात वितुष्ट आल्यानंतर चंद्रपूरच्या प्रियकराने त्याच्या नवीन मैत्रिणीला घेऊन नागपूर गाठले. येथे होस्टेलमध्ये राहणाऱ्या आधीच्या प्रेयसीला बाहेर बोलवून नव्या मैत्रिणीसोबत ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून मारहाण करून तिचा विनयभंग केला. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. चेतन हनुमया दासर (वय २३) असे आणि अपूर्वा अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही चंद्रपूरचे रहिवासी आहेत.पीडित तरुणी (वय १९) चंद्रपूरची मूळ रहिवासी आहे. ती हिंगण्यातील एका महाविद्यालयात शिकते. प्रतापनगरात ती होस्टेलमध्ये राहते. चंद्रपूरच्या वेकोलि वसाहत, रयतवाडीत राहणारा आरोपी चेतन दासर याच्यासोबत तिची दहावीत असताना ओळख आणि मैत्री झाली, नंतर त्या दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. वर्षभरापूर्वी शिक्षणाच्या निमित्ताने ती नागपुरात आली. त्यानंतर चेतन आणि तिच्या प्रेमसंबंधात वितुष्ट आले. त्यांचे ब्रेकअप झाले तरी आरोपी अधूनमधून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास तक्रार करणारी तरुणी तिच्या होस्टेलमध्ये असताना आरोपी चेतन त्याच्या अपूर्वा नामक मैत्रिणीसोबत आला. अपूर्वाने पीडित तरुणीला आपण चंद्रपूरची आहो, बोलायचे आहे, असे सांगून आरोपी चेतनच्या कारजवळ नेले. तिला कारमध्ये बसविले. आतमध्ये चेतन दिसताच तरुणी खाली उतरून होस्टेलकडे जाऊ लागली. त्यामुळे अपूर्वाने तिचा हात पकडला. चेतनने शिवीगाळ करून पीडित तरुणीचे केस पकडून तिला मारहाण केली. डोळ्याजवळ ठोसा लागल्याने तरुणीला जबर दुखापत झाली. तिने बचावासाठी आरडाओरड केल्याने आरोपी चेतन आणि अपूर्वा पळून गेले. पीडित तरुणीने आपल्या आईवडिलांना ही माहिती देऊन नागपुरात बोलवून घेतले. त्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. फौजदार राजेश राऊत यांनी आरोपी चेतन दासर आणि त्याची मैत्रीण अपूर्वा या दोघांवर मारहाण करून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट