शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून वाद : नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:39 IST

प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाल्याने एका गटातील आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात मनोज गणेश कनोजिया (वय २४) नामक तरुण गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसीताबर्डीत गुन्हा दाखल, चौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाल्याने एका गटातील आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात मनोज गणेश कनोजिया (वय २४) नामक तरुण गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर, मनोजने एका तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सदर तरुणीने दिल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजतादरम्यान हा प्रकार माहेश्वरी भवनाजवळ घडला.सीताबर्डी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचे गेल्या चार वर्षांपासून एका तरुणी (वय २१)सोबत ओळख होती. गुरुवारी सकाळी १० वाजता ती गवळीपुरा येथे गरब्याच्या कार्यक्रमातून परत येत असताना मनोजने तिचा पाठलाग केला. हा प्रकार तरुणीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी मनोजला दुपारी २ वाजता माहेश्वरी भवनजवळ गाठले. तेथे त्याच्याशी वाद घातला. त्याच्या मोबाईलवर उपरोक्त तरुणीचा फोटो डीपीच्या स्वरूपात पाहून आरोपी जितू जगदीश यादव (वय २२), मयूर राजकुमार अहिर (वय २८), निहाल शैलेंद्र जोशी (वय २३) आणि नेहाल ऊर्फ सोनू प्रकाश जरगर (वय २३, रा. गवळीपुरा, टेकडी लाईन) या चौघांनी त्याला दगड आणि काठीने मारून जबर जखमी केले. आजूबाजूची मंडळी धावल्याने मनोज बचावला. उपचारानंतर त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी जितू, मयूर, निहाल आणि जरगर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे तरुणीच्या तक्रारीवरून मनोजविरुद्धही पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक