शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नागपुरात दिवाळीत ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 20:55 IST

दिवाळीच्या कालावधीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना वेटिंगचे तिकीट हातात मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीटही १० टक्के वाढले आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी तिकिटाचे दर दुपटीने वाढविले आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे.

ठळक मुद्देप्रवासभाड्यात दुप्पट वाढ : प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या कालावधीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. प्रवाशांना वेटिंगचे तिकीट हातात मिळत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीटही १० टक्के वाढले आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी तिकिटाचे दर दुपटीने वाढविले आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे.दिवाळीचा सण अनेकजण कुटुंबीयांसोबत साजरा करतात. त्यामुळे नोकरीसाठी बाहेरगावी असलेले नागरिक आपल्या गावाकडे परततात. परंतु दिवाळीच्या कालावधीत रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल होऊन प्रवाशांच्या हाती वेटींगचे तिकीट पडत आहे. एसटी महामंडळाच्या बसेसचे तिकीटही दिवाळीच्या काळात १० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. यात खासगी ट्रॅव्हल्सचे संचालकांनीही प्रवाशांची लूट चालविली आहे. नागपूरातून विविध शहरात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे दर दुप्पट ते तिप्पट करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. परंतु नाईलाजास्तव अधिक रक्कम मोजून त्यांना प्रवास करण्याची पाळी येत आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे दर आणखी आठ दिवस वाढलेले राहणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी दिली.नागपुरातून विविध शहरांचे भाडे

एरवीचे भाडे                 दिवाळीतील भाडेपुणे १०००                     २५२०सोलापूर १०००              १२००औरंगाबाद ७००           १५००कोल्हापूर ११५०            २२००नाशिक १०००               १८००नांदेड ६००                   ९००तिकिट रद्द करण्यासाठी १५ टक्के कपातआपत्कालीन स्थितीत एखाद्या प्रवाशाला ट्रॅव्हल्सचे तिकीट रद्द करायचे झाल्यास ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून १५ टक्के रक्कम कपात करण्यात येत आहे. एकनाथ रक्षक नावाच्या प्रवाशाने बैद्यनाथ चौकातील एका ट्रॅव्हल्समधून पुण्याचे तिकीट खरेदी केले. परंतु काही कारणास्तव त्यांना तिकीट रद्द करण्याची पाळी आली. त्यासाठी संबंधित ट्रॅव्हल्सकडून तिकिटाची १५ टक्के रक्कम कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शासनाकडून दीडपट भाडेवाढीची परवानगी‘दिवाळीच्या काळात रिकाम्या गाड्या पाठवाव्या लागतात. त्यामुळे परतीच्या प्रवासात भाडे दुप्पट करावे लागते. शासनाकडून ट्रॅव्हल्सला दीडपट भाडे आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनंतर ट्रव्हल्सचे वाढलेले भाडे पुर्ववत होईल.’महेंद्र लुले, कोषाध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन, नागपूर

 

टॅग्स :Fairजत्राInflationमहागाई