शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

कोसूरकर बंधूची होती भाईजानवर नजर

By admin | Updated: June 22, 2014 01:02 IST

सक्करदऱ्यातील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंटमधील लग्नात कोसूरकर आणि भाईजानसुध्दा आपापल्या मित्रांसह आले होते. त्यांच्यात प्रारंभी वाहने लावण्याच्या ठिकाणीच शाब्दीक चकमक झडली.

नागपूर : सक्करदऱ्यातील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंटमधील लग्नात कोसूरकर आणि भाईजानसुध्दा आपापल्या मित्रांसह आले होते. त्यांच्यात प्रारंभी वाहने लावण्याच्या ठिकाणीच शाब्दीक चकमक झडली. गोंधळ झाल्याचे पाहून एका ‘भाई‘ने त्यावेळी या सर्वांची समजूत काढली. त्यामुळे तात्पुरता वाद टळला. दरम्यान, कोसूरकर बंधू भाईजान आणि त्याच्या साथीदारांवर नजर ठेवून होते. रात्री ११.३० च्या सुमारास भाईजान (रशिद खान), अब्दुल, रोहित नारनवरे आणि प्रदीप घोडे हे चौघे फ्रीडम मोटरसायकलने आपल्या घराकडे निघाले. कोसूरकर बंधू, रॉबिन बोरकर, रोशन बोरकर, रवी तसेच दद्दू खोब्रागडे आणि गोल्डी कुटे तसेच त्यांच्या साथीदारांनी रशिद व त्याच्या साथीदारांचा स्कॉर्पिओने (एमएच ३१/ बीसी ७४१) पाठलाग सुरू केला. जवळ येताच दद्दू खोब्रागडेने तलवार हातात घेऊन कारच्या खिडकीतून रशिद व त्याच्या मित्रांना ‘गाडी रोक आज तेरा मर्डर करना है‘ असे म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला. आरोपींचे मनसुबे लक्षात आल्याने रशिद व त्याच्या साथीदारांनी रस्त्याच्या कडेने मोटरसायकल घेतली अन् सुसाट वेगाने पुढे निघाले. ते पाहून आरोपी कोसूरकर बंधू वेगात समोर निघून गेले. ते निघून गेल्याचा समज झाल्याने रशिद आणि त्याचे मित्र पुन्हा रस्त्यावरून मोटरसायकल चालवू लागले. हसनबाग परिसरात अचानक कोसूरकर बंधू समोरून (राँग साईड) आले आणि त्यांनी भरधाव स्कॉर्पिओ रशिदच्या मोटरसायकलवर चढवली. परिणामी रशिद आणि अब्दुल चिरडले गेले. तर, प्रदीप आणि रोहित नारनवरे मोटरसायकलसह समोरच्या ट्रकखाली घासत गेले. स्कॉर्पिओचा वेग एवढा जास्त होता की मोटरसायकलला धडक दिल्यानंतर ही स्कॉर्पिओ ट्रकवर आदळली. परिणामी आतमधील कोसूरकर बंधूंसह सात जण जखमी झाले. एकाचा हात निखळला तर, एकाचे डोके फुटले. स्कॉर्पिओ ट्रकवर आदळल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूची मंडळी घटनास्थळी धावत आली. काहींनी नंदनवन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस पोहचण्यापूर्वीच आरोपींनी आपल्या साथीदारांना फोन करून दोन वाहने बोलवली आणि घटनास्थळावरून खासगी रुग्णालयात निघून गेले. नंदनवन पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांना भीषण अपघाताचे चित्र दिसले. जखमी प्रदीप आणि रोहित नारनवरेला मेडिकलला नेण्यात आले. आज रात्री त्याताही मृत्यू झाला. पोलीस अपघाताचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. मात्र, स्कॉर्पिओची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा त्यात तलवारी, चॉपर आणि इतर घातक शस्त्रे दिसली. ही स्कॉर्पिओ कुणाच्या नावावर आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्यात कुख्यात कोसूरकर आणि त्याचे साथीदार असल्याचे कळाल्यामुळे पोलीस चमकले. त्यांनी वरिष्ठांना कळविताच उपायुक्त चंद्रकिशोर मिणा, गुन्हेशाखेचे एसीपी नीलेश राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले ताफ्यासह रुग्णालयात धडकले. (प्रतिनिधी)