या भागातील सुभाषनगर, नेताजीनगर, भवानीनगर, भांडेवाडी आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणाºया लोकांची समस्या आणखी वाढल्या आहेत. या मार्गावर दुपारी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वाधिक वाहतूक असते. यावेळी वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर वाहतूक पोलीस तैनात करण्याची नागरिकांची मागणी आहे. पोलीस असल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि वाहतूक सुरळीत होईल, असे नागरिकांचे मत आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी. भविष्यात अपघात आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि नागरिकांना सुरळीतपणे वाहने नेता येतील. मेट्रो रेल्वेच्या उड्डाण पूलाचे बांधकाम तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या काम बंद आहे. भंडारा मार्गावर पिलर टाकण्यात येत असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे एका मार्गावर ट्रक जाईल, एवढीच जागा आहे. त्यामुळे वाहतुकीच होणारी कोंडी ही नेहमीचीच बाब आहे. त्यावर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे.
पारडी रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST