शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

लंडनच्या महिलेने नागपूरच्या व्यावसायिकाला अडीच लाखांने फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:32 IST

नागपुरातील एका व्यावसायिकाला लंडनच्या महिलेची ‘फ्रेण्डशिप रिक्वेस्ट एक्सेप्ट’ करणे महागात पडले. या कथित महिलेने व्यावसायिकास अडीच लाखाचा चुना लावला.

ठळक मुद्देनऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल‘फ्रेण्डशिप रिक्वेस्ट एक्सेप्ट’ करणे महागात पडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील एका व्यावसायिकाला लंडनच्या महिलेची ‘फ्रेण्डशिप रिक्वेस्ट एक्सेप्ट’ करणे महागात पडले. या कथित महिलेने व्यावसायिकास अडीच लाखाचा चुना लावला.नऊ महिन्यांपूर्वी घडलेल्या याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.फिर्यादी मकरंद प्रकाश चांदूरकर (४५) रा.अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट हे रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. ही घटना १५ नोव्हेंबर २०१८ ते २२ नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडली. चांदूरकर हे शेअर ट्रेडिंग आणि रियल इस्टेटचे व्यावसायिक आहेत. त्यांना लंडन येथील जेनिफर गॉरेढ या महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. मकरंद व्यावसायिक असल्याने त्यांनी आधी जेनिफरचे प्रोफाईल तपासले. त्यासुद्धा रिअल इस्टेटच्या व्यवसायात असल्याचे दिसले. एकाच व्यवसायात असल्याने मकरंद यांनी जेनिफरची फ्रेण्ड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. मैत्रीनंतर जेनिफरने भारतात येऊन व्यवसाय करण्याची इच्छा दाखविली. त्यावर मकरंद यांनी उपलब्ध जागेबद्दल माहिती करून दिल्यानंतर जेनिफरने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली.१६ नोव्हेंबर २०१८ रोजी आपण लंडन येथून मुंबईमार्गे दिल्लीला येत असल्याचे जेनिफरने मकरंदला सांगितले. तसेच विमानाचे तिकीट, विमानात बसल्याचा व्हिडिओ पाठवून मकरंद यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, काही तासांनीच मकरंद यांना एक फोन आला.मोबाईलधारकाने दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकारी असल्याचे सांगून जेनिफर हिने पाच लाख पौंडचा डीडी विनापरवागी व नोंदणी न करता भारतात आणला. डीडीच्या नोंदणीकरिता ७६ हजार ७०० रुपये लागतील, असे मकरंदला सांगितले, त्यावर जेनिफर हिनेसुद्धा उपरोक्त रक्कम लागेल, असे सांगितले. जेनिफर आपल्या म्हणण्यावरून भारतात आली, आता ती अडचणीत आहे, त्यामुळे तिला मदत केली पाहिजे, या उद्देशाने मकरंद यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात ७६,७०० रुपयांची रक्कम पाठविली. त्यानंतर पुन्हा आरोपींनी फोन करून डीडीचा मनी लाँड्रिंग प्रमाणपत्राकरिता १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. मकरंद यांनी तीही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविली. नंतर मात्र मकरंद यांना शंका आली. त्यांनी इंटरनेटवरून दिल्ली विमानतळ येथे संपर्क साधून चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी फिर्यादी मकरंद यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध नऊ महिन्यानंतर आयटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीWomenमहिला